पाचोरा- शहरात आजत केवळ एकच रुग्ण बाधित असून त्यालादेखील 29 तारखेला डिस्चार्ज दिला जाणार असून पाचोरा शहर करुणा मुक्त होणार असल्याची चिन्ह असून नागरिकांनी कोरोनाला दूर राखण्यासाठी प्रत्येक महिन्याचे शेवटचे तीन दिवस जनता कर्फ्यू उस्फूर्तपणे पाळावा असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नागरिकांना केले. यावेळी बोलताना आमदार किशोर पाटील यांनी सांगितले की येणाऱ्या काही दिवसात पाचोरा शहरात वैद्यकीय विभागाच्या तेरा टीम तयार केल्या जाणार असून शहरातील 19200 घरातील नागरिकांची ऑक्सिजन लेव्हल आणि टेंपरेचर तपासले जाणार असून गरज भासल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा नागरिकांना पोहोचविल्या जाणार असून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी देखील या टीमला पूर्ण सहकार्य करावे असे म्हटले. आमदार किशोर पाटील यांनी विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींशी देखील चर्चा केली जाईल आणि या जनता कर्फ्यूमधून कृषी सेवा दूध,मेडिकल आणि वैद्यकीय सेवा वगळण्यात येतील असेही सांगितले. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी 28 एप्रिल रोजी पाचोरा शहरात पहिला रुग्ण आढळला होता आणि 29 मे ला पाचोरा शहर कोरोना मुक्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना पाचोरा शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल तसेच आरोग्य,पोलीस,नगरपरिषद,स्वच्छता कर्मचारी आणि माध्यमांनी केलेली कामगिरी प्रशंसनीय असल्याचे सांगितले.यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे,नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर,दिपकसिंग राजपूत,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, डॉ अमित साळुंखे , स्वीय सहाय्यक राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.