पाचोरा – शहरातील जय किरण प्रभाजी पतसंस्थेचे चेअरमन ऍड अतुल सुभाषचंद संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त कोंडवाडा गल्ली भागातील प्राथमिक विद्यामंदिरात शालेय विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आले. ता ८ रोजी सकाळी दहा वाजता प्राथमिक विद्यामंदिराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमात शाळेतील मुला-मुलींना ५० शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन ईश्वर पाटील,संचालक प्रमोद बांठिया, ऍड अण्णासाहेब भोईटे, अमित संघवी, शिवाजीराव आव्हाड, तसेच व्यवस्थापक पारसमल बोथरा, राजेश जैन, शिवाजीराव पाटील माणिकराजे ट्रस्टचे सेक्रेटरी ऍड योगेश पाटील, प्रा रवींद्र चव्हाण, शिवाजी शिंदे,राजेंद्र सुखदेव पाटील, अनिल आबा येवले, संदीप जैन आदी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर ऍड.अतुल संघवी व जय किरण प्रभाजी पतसंस्थेतर्फे ईश्वर पाटील व अण्णासाहेब भोईटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती बागड यांनी प्रास्ताविक केले, पंडित कुंभार यांनी सूत्रसंचालन केले,तर हेमराज पाटील यांनी आभार मानले.