- आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
पाचोरा – पाचोरा-भडगाव तालुक्याचा सर्वांगीण विकासव्हावा.प्रवास सुखाचा व्हावा, वेळेची व इंधनाची बचत व्हावीम्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रस्ता सुधारणा वमजबुतीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करूनमा.ना.दादा भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांची वारंवारत्यांच्या दालनात भेटी घेतल्यात. रस्ता दर्जोन्नतीचे गांभीर्य मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले. म्हणून मंत्री महोदयांनीतातडीने निर्णय घेऊन रस्ता सुधारणांसाठी ०९ कोटी निधीमंजूर केलेला असून प्रशाकीय मान्यता देखील प्राप्त झालेलीआहे. लवकरच कामास सुरुवात करण्यात येईल.
आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यासयश प्राप्त झालेले असून, पाचोरा भडगाव तालुक्यातील १). रामा ३९ भोरटेक खु-टाकळी बु-घुसर्डी-होळ ( लांबी ६.५४कि.मी) ३६१.८८ रुपये, २). लोहारी खु ते लासुरे रस्ता (लांबी१.६८ कि.मी) ११७.१२ रुपये, ३). भाग रामा ४० सारोळा-वाघुलखेडा-खडकदेवळा रस्ता (लांबी ६ कि.मी) ३७०.७९रुपये, ४). कोठली ते भराडी वस्ती रस्ता (लांबी १ कि.मी) ६३.८१ रुपये, आदी गावांना मुख्यमंत्री ग्रामसडकयोजनेअंतर्गत ०९ कोटी रुपये निधी मंजूर पाचोरा-भडगावतालुक्यातील रस्ता मजबुतीकरण व सुधारणेसाठी मांजरझालेले आहेत. म्हणून आमदार किशोर अप्पा पाटील यांनी ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, ना.गिरीष महाजनजलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जळगाव, ना.दादा भुसे ग्रामविकास राज्यमंत्री, आदी मान्यवरांचे आभार व्यक्त केले. परिसरातील नागरिकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांचेअभिनंदन केले. आनंद व्यक्त केला व कौतुक करीत केले.