Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा पीपल्स बँक वार्षिक सभेत सभासदांच्या भावनांचा उद्रेक

najarkaid by najarkaid
October 1, 2019
in जळगाव
0
पाचोरा पीपल्स बँक वार्षिक सभेत सभासदांच्या भावनांचा उद्रेक
ADVERTISEMENT

Spread the love

  • विविध ठरावास मंजुरी : गैरकारभार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

पाचोरा( प्रतिनिधी)येथील पीपल्स बँकेच्या सोमवार ता 30 रोजी झालेल्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गतकाळातील व्यवहारा संदर्भात सभासदांच्या भावनांचा अक्षरशः उद्रेक झाला बँकेच्या हितासाठी चे विविध ठराव पास करण्यात येऊन ज्यांनी आतापर्यंत गैरव्यवहार केला त्यांचेकडून केवळ वसुली न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. देशमुख वाडी भागातील अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा झाली बँकेचे प्रशासक एम आर शहा अध्यक्षस्थानी होते याप्रसंगी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी पी एल परदेशी व्यवस्थापक आर एस पाटील पी डी पाटील वसुली अधिकारी आर बी तडवी होते.

पाचोरा येथील पीपल्स बँकेच्या सभेत लेखा परीक्षण अहवाला संदर्भात स्पष्टीकरण देऊन जाब विचारताना व्ही टी जोशी व सभेला उपस्थित सभासद .

सभेच्या सुरुवातीला विविध क्षेत्रातील मृतांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली शिभांगी फासे (शेंदुर्णी) या विद्यार्थिनीने सहकार गीत सादर केले या बैठकीस माजी संचालक व्ही.टी जोशी सतीश चौधरी प्रकाश पाटील दत्तात्रय वाणी प्रा भागवत महालपुरे नंदू सोनार डॉ जयंत पाटील ॲड अविनाश भालेराव राजेंद्र भोसले चंद्रकांत लोढाया नंदकुमार सोनार सिताराम पाटील दत्तात्रय बोरसे उत्तमराव थोरात (शेंदुर्णी) सुनील शिंदे नितीन संघवी शांताराम पाटील ॲड प्रशांत कुलकर्णी सी ए प्रशांत अग्रवाल रवी केसवानी अनिल येवले राजाराम सोनार विजय जैन संदीप महाजन प्रवीण ब्राह्मणे बी एस पाटील आदी उपस्थित होते.
सभेत गतकाळात संचालकांनी एकाच वेळी दिलेल्या राजीनामा प्रकरणामुळे सत्ताधारी अल्पमतात येऊन प्रशासक नियुक्त करण्यात आला वेळोवेळी प्रशासकही बदलण्यात आले याबाबत रोष व्यक्त करण्यात आला. आर एस पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केल्यानंतर त्यावर ॲड अविनाश भालेराव प्रशांत अग्रवाल नंदू सोनार यांनी आक्षेप घेत सभेचा कोरम पूर्ण नसताना सभेत विषयांना मंजुरी कशी देण्यात आली ? याबाबत जाब विचारला त्याचे स्पष्टीकरण पी डी पाटील यांनी दिले .उत्तमराव थोरात यांनी बँकेचे 20हजार सभासद असताना केवळ 400 सभासद बसण्याची क्षमता असलेला हॉल सभेसाठी काय घेतला ?असा प्रतिप्रश्न केला अनिल नागणे यांनी जाणीवपूर्वक सभेचा अहवाल सभासदांना देण्यात न आल्याचा आरोप केला. शांताराम पाटील सिताराम पाटील यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय व निवृत्तीचे वय झाले असतानाही कर्मचारी कामावर ठेवणे मागचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित करून प्रशासकांना धारेवर धरले .
व्ही टी जोशी यांनी बँकेच्या लेखापरीक्षण अहवालातील आकडेवारी सांगून नफा जास्त दाखविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले काही फर्मला कोणत्याही प्रकारचे तारण न ठेवता दिलेले कर्ज कर्ज देणे घेणे व कमी जास्त रकमेचे हप्ते लावणे यासंदर्भात चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. गतकाळातील निवडणुकांचा खर्च सहकार विभागामार्फत योग्यरीत्या दाखवला जात नाही गतकाळातील निवडणुकीचे अजूनही सुमारे अडीच लाखांची वसुली बाकी आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून पिग्मी एजंट च्या प्रॉव्हिडंट फंड साठी लाखो रुपयांची तरतूद कशी केली जाऊ शकते तसेच बँकेचा 16 कोटींच्या ठेवी असताना व 20 कोटी थकीत कर्ज असताना देखील एनपीए बाबत ची आकडेवारी चुकीची दाखवण्यात आली आहे. नफ्यामध्ये तफावत असल्याचा विषय नंदू सोनार यांनी मांडला .प्रवीण ब्राह्मणे यांनी प्रशासकांच्या कारवाई संदर्भात संतप्त भावना व्यक्त केल्या प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे 40 जणांना भाजीपाला व्यवसायासाठी ज्यांना कर्ज दिले आज त्या कर्जदारांच्या थांगपत्ता नाही याला जबाबदार कोण रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम कधी केले जाईल अशा प्रश्‍नांची सरबत्ती प्रशासकांवर करण्यात आली .
तसेच बँकेचे सॉफ्टवेअर बोगस असून जेवढ्या किमतीचे सॉफ्टवेअर आहे त्यापेक्षा जास्त त्यांना वार्षिक देखभालीचा खर्च कोणत्या नियमानुसार दिला जातो असा प्रश्न संदीप महाजन यांनी उपस्थित केला जळगाव शाखेतून लाख रुपये काढून तो प्रकार लपवण्यासाठी पाच लाखांचे होम लोन परस्पर करण्यात आले याबाबत चौकशीची मागणी सिताराम पाटील यांनी केली डी एफ पाटील यांनी बँकेने ग्राहक मेळावे घेण्याबाबत सूचित केले . प्रकाश पाटील प्रा सी एन चौधरी रवी केसवानी सुनील शिंदे अनिल येवले डॉ जयंत पाटील सतीश चौधरी यांनीही बँकेच्या एकूणच कामकाजासंदर्भात तक्रार वजा सुचना मांडल्या. सभा तीन तास चालली सभेत विविध विषयांवर वादळी चर्चा होऊन लवकरात लवकर निवडणूक घेण्यासंदर्भात ठराव मांडण्यात आला कर्ज प्रकरणासाठी लीगल ॲडव्हायझर बँकेने नियुक्त करण्यात यावा याबाबतचा ठराव व्ही टी जोशी यांनी मांडला त्यास सभागृहाने मान्यता दिली प्रशासक एम आर शहा यांनी सभासदांच्या व माजी संचालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली व सभेचे प्रास्ताविक केले मुख्य कार्यकारी अधिकारी पी एल परदेशी यांनी सूत्रसंचालन केले शाखा व्यवस्थापक पी डी पाटील यांनी आभार मानले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; खडसे, तावडे यांचे नाव नाही!

Next Post

“कमळ” फुलविणारे नाथाभाऊ आज मात्र भाजपच्या वागणुकीने कोमजले !

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
“कमळ” फुलविणारे नाथाभाऊ आज मात्र भाजपच्या वागणुकीने कोमजले !

"कमळ" फुलविणारे नाथाभाऊ आज मात्र भाजपच्या वागणुकीने कोमजले !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us