
पाचोरा, (प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हद्दीतील निमखेडा शिवारात गावठी दारू अड्डयावर पोलिसांची कारवाई डि.वाय.एस.पी ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिसांनी आज कारवाई केली..
आज दि १७/0४/2020 रोजी पिंपळगाव हरेश्वर पो स्टे हद्दीत निमखेडा शिवारात नाल्या चे काठावर गावठी दारूची हातभट्टी चालू असलेबाबत पोलीस पाटील ऐश्वर्या पाटील सिंदाड यांनी दिलेल्या माहिती वरून पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन दारूची भट्टी उध्वस्त करून कच्चे गुळ मिश्रीत रसायन 590 लिटर,पक्के उकळते गूळ मिश्रीत रसायन 160 लिटर व गाहभ तयार दारू 25 लिटर असा एकूण 22,800 रु.चा गुन्हयाचा माल जागीच नष्ट करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून आरोपी फरार असून गूळ व कच्चा माल कोणते दुकानदाराने पुरवला त्याचे विरुद्ध कार्यवाही करीत आहोत.














