पाचोरा प्रतिनिधी – पाचाेरा तालुका ओला दुष्काळ म्हणनुन जाहीर करावा अशी मागाणी संभाजी ब्रिगेड ने प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी आज दि.16 रोजी केली.

पाचोरा तालुक्यात सततच्या संततधार पाऊसामुळे मोठया प्रमाणात पिकांना किड लागुन ती नष्ट होत आहेत. आतापर्यंत मका पिक हे लष्करी अळीच्या प्रभावाने पूर्ण नष्ट झाले असुन त्याच बरोबर कापुस व इतर पिक नष्ट झाले असुन त्या संबंधी ताबडतोब पंचनामे करण्यात यावे आणि पाचाेरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकरी यांना त्वरीत मदत मिळावी अशी मागाणी संभाजी ब्रिगेड ने निवेदनाद्वारे केली यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्याक्ष गणेश पाटील, तालुकाध्याक्ष जिभाऊ पाटील, जिल्हा उपाध्याक्ष गजमल पाटील, माजी तालुकाध्याक्ष राजेंद्र पाटील, ता.कार्यध्याक्ष सर्जेराव पाटील, शहरध्याक्ष रविंद्र देवरे , शहर कार्यध्याक्ष मुकेश तुपे, सुरेश दळवी, सचिन पाटील, विशाल परदेशी, विजय जाधव, आसीफ खाटीक, भुपेश देसले, अमजद खान, रईस शेख, आनंत पाटील,जय कोळी, राहुल गायकवाड, गणेश पाटील, मोहसीन पिंजारी आदी पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















