पहूर, ता.जामनेर- जगप्रसिद्ध अजिंठा लेणींच्या कुशीतुन उगम पावलेल्या वाघूर नदीस डोंगररांगेत झालेल्या दमदार पावसामुळे आज मोठा पूर आला.भाद्रपद महिन्यातही श्रावण महिन्यासारखी पावसाची रिपरिप सुरू असून शेतीची कामे खोळंबत आहेत.
आज वाघूर नदीला आलेला पूर हा गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा पुर असावा. वाघूर नदीच्या पुराने नदी पात्रातील अतिक्रमित केलेल्या काही दुकानांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तर पहूर कसबे येथील शिवमंदिराच्या पायथ्याला पुराचे पाणी लागले. तर कसबे येथील वाघूर नदीच्या पात्रातील मटण मार्केट लाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.
यंदा पहूर सह परीसरात गेल्या दहा वर्षांत झाला नाही येवढा पाऊस या वर्षी होत आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात यंदा प्रथमच वाघूर नदी खळाखळा ओसंडून वाहत आहे. तर वाघूर नदी पात्रालगत असलेल्या स्मशान भुमीही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तर सतत धार पावसाने परिसरात असलेल्या सर्व नाले, आड,शेरातील विहिरी, या ओसंडून वाहत आहे. तर वाघूर नदीचे पात्रालगत असलेल्या एक हात पंप आपोआप ओसंडून वाहत आहे. यंदा तब्बल दहा ते बारा वेळेस वाघूर नदीला पुर आला असला तरीही आजचा वाघूर नदिस आलेला पुर खुप मोठा आहे. पुर पाहण्यासाठी वाघूर नदीच्या पुलावर गावकऱ्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पहूर पोलीस व होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.
पुरामुळे हिवरी आणि हिवरखेडा गावांचा संपर्क तुटला होता . येथे पुल बांधण्याची मागणी प्रलंबित असून गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.