मुंबई – भाजप नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जाणता राजा’ या उपमेवरून शरद पवार यांच्यावर आज अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओद्वारे उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजा असल्याचे त्यांनी म्हटले. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा शरद पवार यांचा अभ्यास असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न आदी प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडे असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. शरद पवार यांची करंगळी पकडून अनेकजण राजकारणात आले. अनेकांनी त्यांच्यावर टीका करून राजकारणात प्रस्थापित झाले असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.