मुंबई- राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून पुढे जाऊ. राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असं काँग्रेसचे खासदार दलवाई यांनी सांगितलं. दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तेचा पेच निर्माण झालेला असतानाच पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेत्याने शिवसेना नेत्यांशी चर्चा केल्यानेही काँग्रेस-शिवसेनेचे सूर जुळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना पहिल्यांदाच काँग्रेसच्यावतीने हुसेन दलवाई यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. भाजपने राज्याच्या विकासाची आणि अर्थकारणाची वाट लावली आहे. त्यामुळे सामाजित दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे सरकार येऊच नये अशी काँग्रेसची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही. याबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा, असं दलवाई म्हणाले. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये, या माझ्या विधानात बराच अर्थ दडलेला आहे. त्यात सर्व काही आलंय. कोणत्याही परिस्थिती भाजपचा मुख्यमंत्री नकोच, असं सांगतानाच भाजपला सरकार सत्ता स्थापनेचा अधिकारच नाही. त्यांनी विरोधी पक्षातच बसावं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.















