दिल्ली – महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी यासह इतर मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे.
परमवीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असून मुंबई पोलिस आयुक्तपदावरून स्वत: च्या बदलीच्या अधिसूचनेवर बंदी घालण्याची अर्थात बदली आदेशाला स्थगिती मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याचं बरोबर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचीही मागणी केली आहे.या याचिकेवर आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.















