Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पथराड येथे शेतकरी मेळावा उत्साहात ; शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा-सेवा हक्क आयुक्त चित्रा कुळकर्णी

najarkaid live by najarkaid live
February 10, 2023
in जळगाव
0
पथराड येथे शेतकरी मेळावा उत्साहात ; शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा-सेवा हक्क आयुक्त चित्रा कुळकर्णी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.8 (प्रतिनिधी) –नागरिकांसाठी शासनाने सेवा सुरू केलेल्या आहेत. सेतु, आपले सरकार ईसेवा केंद्र येथे जाऊन शासनाच्या सेवा मिळवू शकतात. जास्तीतजास्त नागरीक, शेतकऱ्यांनी या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक विभाग सेवा हक्क आयुक्त चित्रा कुळकर्णी यांनी केेले. पथराड येथील प्रगतीशील शेतकरी श्रीकांत चव्हाण यांच्या शेतात जैन फार्म फ्रेश फूडस लिमिटेड आणि ‘कागोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी चर्चासत्र आणि शिवार फेरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी जळगाव संभाजी ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी जाधवराव, धरणगाव नायब तहसीलदार सातपुते, तालुका कृषी अधिकारी पी.जी. चव्हाण, करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा, जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे रोशन शहा, शास्त्र डॉ. बी.के. यादव, कागोमी कंपनीचे भारताचे प्रमुख मिलन चौधरी, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक डी.एम.बऱ्हाटे, कागोमी सीडस् विभागाचे व्यवस्थापक व्यंकट पवार हे मान्यवर उपस्थित होते.

सेवा हक्क आयोग आयुक्त चित्रा कुळकर्णी यांनी शेतकऱ्यांना सेवा व हक्क याबाबत सविस्तर सांगितले. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यात २०१५ पासून लोकसेवा हक्क कायदा अंमलात आला आहे. शासनाच्या विविध विभागांकडून अधिसूचनित केलेल्या सेवा, ठराविक मुदतीत प्राप्त करून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. महाराष्ट्र शासनाच्या ५०६ सेवा त्या अंतर्गत येतात. सद्यस्थितीत ३८७ सेवा ऑनलाईन अर्ज करून मिळतात अशी माहिती त्यांनी शेतकऱ्यांना भाषणातून दिली.

आरंभी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुरवातीला शेतकर्‍यांनी टोमॅटो’ लावलेल्या शेताची पाहणी केली. त्यावेळी शेतकरी श्रीकांत चव्हाण, कृषीतज्ज्ञ विरेंद्रसिंग सोळंकी, श्रीराम पाटील, जैन इरिगेशन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे यांनी पीक व  ठिबक सिंचन,  तुषार सिंचन याबद्दल माहिती सांगितली.

कागोमी कंपनी भारताचे प्रमुख मिलन चौधरी यांनी कागोमी कंपनी आणि टोमॅटो व्हरायटी बाबत सविस्तर सांगितले. जैन इरिगेशन व कागोमी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या करार शेतीबद्दल मोलाची माहिती दिली. ज्यांच्या शेतात हा शेतकरी मेळावा झाला ते शेतकरी श्रीकांत चव्हाण यांनी आपल्या कंत्राट फार्मिंग आणि शेतीचे अनुभव सांगितले. माझ्या शेतात गत वर्षी टोमॅटो रोपे लावली होती मला खूप फायदा झाला म्हणून मी पुन्हा टोमॅटो लागवड केली,  एका झाडाला 10 ते 12 किलो टोमॅटो लागतील. जैन इरिगेशनशी  झालेल्या करारानुसार तो सगळा टोमॅटो जैन इरिगेशन हमी भावाने टोमॅटो खरेदी करतात. त्यामुळे मला शाश्वत उत्पन्न मिळणार हे आवर्जून सांगितले.

 जैन इरिगेशन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे, कागोमीचे व्यंकट पवार, तलाठी कांचन वाणी यांनी देखील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन पांढरा कांदा करार शेती विभागाचे सहकारी श्रीराम पाटील यांनी केले. जळगाव, पाळधी, धरणगाव, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील सहाशे हून अधिक शेतकरी या शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पाचशे ‘आपला दवाखाना उभारणार – मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Next Post

लोकसेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार ; जाणून घ्या कायदा…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
लोकसेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार ; जाणून घ्या कायदा…

लोकसेवा हक्क कायद्यामुळे नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार ; जाणून घ्या कायदा...

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us