जळगाव प्रतिनिधी | शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या एका कॅफे करण्यात आलेल्या पोलीस कारवाईची बातमी प्रसारित केल्याने पत्रकार आनंद शर्मा यांना धाकाविण्यात आले आहे. पत्रकाराला धमकावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
काय म्हटलं आहे निवेदनात
शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्व्हल कॅफेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था आहे. त्याठिकाणी अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅफेत दोन युगल देखील मिळून आले. संबंधित कॅफे चालकावर कारवाई देखील करण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती आणि अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. तदनंतर संपादक आनंद शर्मा यांना सदर व्हिडीओ वृत्त हटविणे संदर्भात किंवा कारवाई करण्याची धमकी देणारे दोन फोन मोबाईल क्रमांक +918806301500 (पहिला फोन) व +918856061322 (दुसरा फोन) यावरून आले होते. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या नंबर वरून पत्रकारांना धमक्या देण्यात आले त्या नंबरची सखल चौकशी करून ते व्यक्तींवर, संबंधित कॅफे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करावी, विनंती.
















