Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर

शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नव्याने नाव नोंदविण्याचे आवाहन -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद                                  

najarkaid by najarkaid
October 3, 2023
in जळगाव
0
१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येणार
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव : दि. 3 ऑक्टोंबर, 2023 (प्रतिनिधी)-  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम जाहिर झाला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी यापुर्वीची शिक्षण मतदारसंघाची मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार नसल्याने सन 2023 च्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी नाव नोंदवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

            पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी 6 नोव्हेंबर, 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.  नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी सर्वसाधारण निवासी असलेले आणि 1 नोव्हेंबर 2023 पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक 19 भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जाणार नाही, असेही  श्री. प्रसाद यांनी सांगितले.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम असा

            30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध झाली आहे, सोमवार 16 ऑक्टोंबर, 2023 रोजी मतदार नोंदणी अधिनियमान्वये नोटिसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी केली जाईल. बुधवार 25 ऑक्टोंबर, 2023 रोजी द्वितीय नोटीस पुर्नप्रसिद्धी केली जाईल. नमुना 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक सोमवार 6 नोव्हेंबर, 2023 असेल. त्यानंतर सोमवार 20 नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या गुरुवार 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर 25 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि शनिवार 30 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

अर्हता बाबत महत्वाच्या बाबी

शिक्षण संस्थेत अध्यापनाचा कालावधी सलग असू शकतो किंवा तुटक असू शकतो.

राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या शिक्षण संस्थेतील अध्यापन हे एकतर एका संस्थेत किंवा अधिक संस्थांमध्ये असू शकते.

 एकापेक्षा अधिक अधिसूचित शैक्षणिक संस्थांसाठी, असा प्रत्येक शैक्षणिक संस्थेच्या संस्था प्रमुखाचे प्रमाण फॉर्म-19 सोबत जोडणे आवश्यक आहे.

शिक्षक म्हणून निर्दिष्ट शिक्षण संस्थेत नियुक्ती एकतर नियमित किंवा नैमित्तीक तत्वावर आधारावर असू शकते, मात्र अर्जदार पूर्णवेळ शिक्षक असणे बंधनकारकच आहे.

अर्धवेळच्या अध्यापनाकरीता / तासिका पध्दतीवर असलेले शिक्षक नोंदणीस पात्र नाहीत.

विनाअनुदानित खाजगी शाळेतील अध्यापक जर अधिसूचित शिक्षण संस्थेत समाविष्ट असेल, तर ते देखील पात्र आहेत.

नोंदणी करण्याची पात्रता, अर्जदाराच्या सामान्य निवासस्थानाच्या आधारावर निर्धारित केली जाईल आणि त्याच्या कामाच्या ठिकाणाच्या आधारावर नाही.

शिक्षणसंस्थेचे प्राचार्य / मुख्याध्यापक त्यांच्या संस्थेअंतर्गत काम करणा-या सर्व पात्र कर्मचा-यांचे फॉर्म 19 मधील अर्ज ते कर्मचारी ज्या विधानसभा मतदारसंघाचे रहिवाशी आहेत त्या पदनिर्देशित सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी म्हणजे तहसिलदार यांच्याकडे पाठवावे.

ज्या प्रकरणात अर्जाच्या दिनांकास व्यक्ती शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत नसेल, अशा प्रकरणात ती व्यक्ती शेवटी ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये कार्यरत होती, त्या शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र देणे अवश्यक आहे.

विवाहित महिला शिक्षक मतदाराच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, अशा विवाहीत महिलेच्या शैक्षणिक व अन्य अर्हता प्रमाणपत्रावर तिचे विवाहाचे पूर्वीचे नाव नमूद असल्यास, तिच्या विवाह प्रमाणपत्राच्या आधारे किंवा शासकीय राजपत्रातील नाव बदलाबाबतच्या नोंदीच्या आधारे वैधता तपासण्यात यावी. मात्र ही दोन्ही कागदपत्रे उपलब्ध नसल्यास सदर महिलेच्या पॅनकार्ड वरील माहितीच्या आधारे ही वैधता निश्चित करता येऊ शकेल.

            जर शिक्षक लगतच्या सहा वर्षामध्ये निवृत्त झाले असतील परंतु त्यांचा लगतच्या सहा वर्षांपैकी तीन वर्षाचा अध्यापनाचा काळ पूर्ण झाला असेल, तर असे निवृत्त शिक्षक देखील मतदार नोंदणीस पात्र राहतील.

 अर्ज भरतांना अर्जदारांकडून त्यांचे नाव ज्या विधानसभासंघाच्या मतदार यादीत आहे. त्या विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदार यादी क्रमांक आणि अनुक्रमांक तसेच निवडणूक ओळखपत्राचा अनुक्रमांक अवश्य नमुद करणेस सुचित करावे, विधानसभा मतदारसंघातील नाव www.ceo.maharashtra.gov.in  व https://ceoelection.maharashtra.gov.in/search/   या लिंक वर क्लिक करून आपला जिल्हा मतदारसंघ निवडून आपले नाव टाईप केल्यास मतदार यादी भागाचे नाव अनुक्रमांक उपलब्ध होईल. मतदार नोंदणी अर्जात मतदारांचा भ्रमणध्वनी क्रमांक / ईमेल आय. डी. देखील नमुद करून घ्यावा.

 मतदार नोंदणीसाठी अर्ज आपल्या शाळा / महाविद्यालयांना देण्यात येत आहेत. त्यानुसार आपल्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक / प्राध्यापक यांना अर्ज उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. अर्ज www.ceo.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर https://ceoelection.maharashtra.gov.in/Downloads/Downloadforms/Form-19.pdf   या लिंकवर उपलब्ध आहेत. अर्ज मराठी आणि इंग्रजी मध्ये आहेत, यापैकी कोणत्याही भाषेतील नमुना वापरता येईल.

मतदार नोंदणी अर्ज आपल्या लेटरपॅडवरील पत्र व यादीसह, ते कर्मचारी ज्या विधानसभा मतदारसंघाचे रहिवाशी आहेत त्या पदनिर्देशित सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी म्हणजे तहसिलदार यांच्याकडे जमा करणेत यावेत. अर्ज परिपूर्ण भरूनच आणि आवश्यक पुराव्यांसह जमा करावेत, सुचनांप्रमाणे पुर्तता न केलेले अर्ज नाकारणेत येतील.

 शाळा / महाविद्यालये यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी त्यांचे अधिनस्त शिक्षक / प्राध्यापक यांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करावे. मतदार यादीत नाव नोंदविणेसाठी कार्यालयीन परिपत्रक काढणेत यावे.           आयोगाचे सूचनेनुसार मतदारांकडून कुठल्याही प्रकारे गड्ढा अर्ज स्विकारणेत येणार नाही. मात्र शाळा / महाविद्यालय प्रमुख यांनी त्यांचे कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे अर्ज तपासुन कार्यालयीन पत्राद्वारे मतदारांच्या यादीसह सादर केल्यास तपासून स्विकारणेत येतील. याकरीता आपण आपल्या अधिनस्त पात्र शिक्षकांची 100 टक्के नोंदणी करावी.

 कोणतीही व्यक्ती, जी बाब खोटी असून तो खोटी असल्याचे एकतर तिला ज्ञात असेल किंवा तसे तो समजत असेल किंवा जी खरी असल्याचे ती समजल नसेल त्या बाबी बाबत अर्जात एखादे निवेदन किंवा अभिकथन करील तो, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 चे कलम 31 अन्वये शिक्षेस पात्र असेल, याची नोंद घ्यावी.

नाशिक विभाग शिक्षक मतदार नोंदणी अर्हता

            अर्जदार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील स्थानिक रहिवासी असावा. यासाठी अर्जदारांनी आपले निवडणूक ओळखपत्राची किंवा आधार कार्डची यांची सत्य प्रत स्थानिक रहिवासाचा पुरावा म्हणून अर्जासोबत जोडावी.तसेच पाणी/वीज/गॅस जोडण्याचे देयक (किमान एका वर्षाचे आतील) आधारकार्ड, राष्ट्रीयकृत/शेडयुल्ड बँक/पोस्टाचे खाते पुस्तक, भारतीय पासपोर्ट महसूल विभागाचा जमिनीची मालकी असलेबाबतचा दस्तऐवज त्याबाबतचा  (किसान वही धरुन) नोंदणीकृत भाडे करार (भाडयाने राहत असल्यास) नोंदणीकृत विक्री खत (स्वतःचे घर असल्यास) यापैकी एका दस्ताऐजवाची सत्यप्रत स्थानिक रहिवासाचा पुरावा म्हणून अर्जासोबत जोडावी. तरी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी आपली नाव नोंदणी  करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय!

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' निर्णय!

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us