Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाट्यकर्मींच्या आर्थिक मदतीकरिता शासनाकडे भरघोस निधीची मागणी करणार – ॲड.रोहिणीताई खडसे

najarkaid by najarkaid
November 5, 2020
in जळगाव
0
नाट्यकर्मींच्या आर्थिक मदतीकरिता शासनाकडे भरघोस निधीची मागणी करणार – ॲड.रोहिणीताई खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रंगकर्मी व रसिकांसमवेत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस कोविडसंदर्भातील सर्व नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर व नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर सौ.भारतीताई सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, नगरसेवक अनंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोविडमुळे मान्यवरांचे केवळ हात जोडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर नटराज पूजन व रंगभूमी पूजन झाल्यावर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य शरद पांडे यांनी नांदी म्हटली. कार्यक्रमाप्रसंगी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याबाबत केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचे श्री.मोरे यांनी उपस्थितांना विनंतीवजा सूचना केल्यात.  त्यानंतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यात प्रथम बोलताना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, जागतिक मराठी रंगभूमीच्या सर्व नाट्यकलावंत व नाट्यरसिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत असताना कोविड काळातील आरोग्यविषयक नियम पाळणेही अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृहाशी संबंधित कर्मचारी वर्ग व रंगकर्मी यांना आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी लवकरच महाराष्ट्र शासनाकडे आम्ही भरीव अशा मदतीची मागणी करणार आहोत. आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर नाट्यगृह उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल शासनाचे आभारही त्यांनी मानले.
केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाट्यगृह उघडणे हा सुवर्णकांचन योग असून, केशवस्मृती प्रतिष्ठान सांस्कृतिक चळवळीच्या कायम पाठीशी आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीला वेळ पडली तर पदरमोड करूनसुध्दा देण्यास आम्ही तयार आहोत. शहराचा सांस्कृतिक चेहरा अधिक उज्ज्वल व्हावा, यासाठी ‘कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे केशवस्मृती प्रतिष्ठान कटीबध्द आहे. कोविडचे आरोग्यसंदर्भातील सर्व नियम पाळून नाट्यगृह सुरु केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील याप्रसंगी बोलताना म्हणाले की, नाट्यगृह सुरु केल्याबद्दल प्रथमतः शासनाचे आभार. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेले भव्य व सर्वसुविधांनी सुसज्ज असलेले नाट्यगृह जळगाव शहरात असल्याचा आम्हांला अभिमान आहे. सांस्कृतिक चळवळीला आमच्यातर्फे काहीही योगदान देणे शक्य असले, तेव्हा कलावंतांनी फक्त आम्हांला हाक द्यावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
कार्यक्रमात शहराचे आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, नगरसेवक अनंत जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष शंभू पाटील यांनी केले. रंगभूमीपूजनानिमित्त शहराच्या महापौर सौ.भारतीताई सोनवणे, उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, कोषाध्यक्ष प्रा.शमा सराफ यांच्यासह जळगावातील चिंतामण पाटील, पियुष रावळ, शरद पांडे, प्रविण पांडे, प्रा.राजेंद्र देशमुख, ॲड.पद्मनाभ देशपांडे, ललित पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे रत्नाकर पाटील, किरण सोहळे, अरुण सानप, पुरुषोत्तम चौधरी, विनोद ढगे, अनिल मोरे, भुसावळचे रंगकर्मी अनिल कोष्टी, सुरेश बारी, राज्य नाट्य समन्वयिका सौ.सरिता खाचणे, मायटी ब्रदर्सचे मिलिंद थत्ते, होरीलसिंग राजपूत आदी रंगकर्मी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

Next Post

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी होणार ?

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री स्टॉलसाठी परवानगी घेणे आवशयक

महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी होणार ?

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us