भुसावळ, – उत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाच्या मार्फत , मुख्याधिकारी भुसावळ नगर परिषद यांना शहरातील पिण्याचे पाणी तसेच इतर समस्यांविषयी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील अ ‘ वर्ग नगर परिषदेत आपली भुसावळ नगर परिषद येत असून देखील कधी 8 दिवसातुन तर कधी 10 दिवसातुन भुसावळ करांना दुर्गंधीयुक्त पाणी मिळत असल्याने शहरातील नागरिकांना अश्या पाण्यामुळे कॉलरा ‘ डायरिया ‘असे अनेक प्रकारचे साथीचे आजार होऊ शकतात यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत . भुसावळ नगर परिषदेने भुसावळातील नागरिकांच्या जीवाशी खेळू नये नगर परिषदेतर्फे संपूर्ण शहरात लोकांना नियमित व स्वच्छ तसेच आर .ओ .ने फिल्टर करून पाणी पुरवठा करावा .अन्यथा कोरोना जाण्यासाठी जसे आम्ही संघर्ष करत आहोत तसे स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला लढावे लागेल असे या निवेदनात म्हटले आहे . यावेळी मा.योगेंद्रजी पाटील,विवेक नरवाडे,भगवान मेढे,ईस्माइल गवळी उपस्थित होते.