जळगाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे संलग्नित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नविन शैक्षणिक धोरणासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुगलमिटच्या माध्यमातून झालेल्या या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावरील कार्यशाळेत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. उच्चशिक्षणाशी संबंधित प्रस्तुत अमुलाग्र बदलांवर चर्चा करण्यात आली. प्रा. हेमंत इंगळे, डॉ. सरोज भोळे, प्रा. तुषार कोळी, प्रा. अतुल बर्हाटे, प्रा. प्रमोद गोसावी, डॉ. विजयकुमार वानखेडे यांनी मते मांडली. तसेच प्राध्यापकांनी एनइपी २०२० मधील सर्व मुद्यांवर चर्चा करून आपापली मते मांडली. एनइपीमधील सर्व मुद्दे आपल्या महाविद्यालयात आपण कसे प्रस्थापीत करू शकतो याबद्दल चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत रोह अहेड फॉर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाची पुढील पाच वर्षात कशी प्रगती राहील यावर सखोल चर्चा करण्यात आली. पुढच्या पंचवार्षिक आखणीची संपुर्ण माहिती विषद करतांना प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी सांगितले की,महाविद्यालय एनबीएकडून मानांकित केले जाइल. महाविद्यालयात इनक्युबेशन आणि स्टार्ट अप हे अद्यायावर विभाग सुरू केले जातील. नविन शैक्षणिक धोरण राबविण्यासंदर्भात महाविद्यालयात आमुलाग्र बदल केले जातील. माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील,डॉ वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत सुत्रसंचालन प्रा. ज्ञानदा कोल्हे यांनी केले. तर यशस्वीतेसाठी प्रा. नकुल गाडगे यांनी परिश्रम घेतले.