Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगावात १०० खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारणार- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

najarkaid live by najarkaid live
July 27, 2020
in जळगाव
0
धरणगावात १०० खाटांचे अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारणार- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि. 27 – धरणगाव येथे लवकरच अद्ययावत उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे १०० ऑक्सीजनयुक्त खाटांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल.अशी महत्वपूर्ण घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धरणगाव  येथे आयोजित अत्याधुनीक कार्डियाक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज धरणगावात कार्डियाक रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात धरणगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बळकटीकरणासाठी सढळ हाताने मदत करणार्‍या दात्यांचा गौरव पालकमंत्र्यांचा हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गुलाबराव वाघ म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अविरत प्रयत्नांमुळे धरणगावात चांगल्या प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. येथे अगदी ४ वर्षाच्या बालकापासून ते ८४ वर्षाच्या वृध्दापर्यंतच्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एका रूग्णाला जळगावच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची वेळ आली तेव्हा रूग्णवाहिका वेळेत उपलब्ध न होवू शकल्याने येथे अद्ययावत रूग्णवाहिका नागरिकांसाठी ना.गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिली आहे. तर काही दिवसांपूर्वीच स्वर्गरथाचे लोकार्पणही करण्यात आले असल्याने धरणगावकरांच्या सेवेत दोन सुविधा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पूर्ण केल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

याप्रसंगी आपल्या मनोगतात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगावात स्वर्गरथ आणि रूग्णवाहिका यांची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. शहरात आधी शिवसेनेची एक आणि १०८ क्रमांकाची शासकीय एक अशा दोन रुग्णवाहिका असून आता अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. याच्या मदतीने गंभीर रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे. धरणगावात अत्याधुनीक असे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे १०० बेडची व्यवस्था असेल. जेणेकरून धरणगावातील रूग्णांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन.एस. चव्हाण यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. तसेच येथील ग्रामीण रूग्णालयासाठी एनआरएचएमच्या माध्यमातून एक कोटी निधीतून नवीन इमारत बांधली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामग्रीसाठी देखील ७० लाखांना निधी प्रदान करण्यात आला असून लवकरच साहित्य उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तर शहराजवळ एम.आय.डी.सी. उभारण्याचा मानस असून शहराच्या आगामी ३० वर्षांची लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे नियोजन सुरू आहे.

मतदारसंघातील कान्या- कोपर्‍यात उत्तम दर्जाचे रस्ते तयार असल्याचे ना. पाटील म्हणाले. धरणगाव शहर हे मोठ्या बाजारपेठेचे शहर म्हणून उदयास यावे
यासाठी आपले प्रयत्न असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून कार्डियाक या आधुनिक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन एस चव्हाण, प्रांताधिकारी विनय गोसावी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश  चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, संजय पाटील, राजेंद्र महाजन, पी. एम. पाटील , उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, गटनेते पप्पू भावे , मुख्याधिकारी जनार्दन पवार, पोलीस निरीक्षक पवन देसले, यांच्यासह आजी माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव वाघ यांनी केले. सूत्रसंचालन पी. एम. पाटील व अभिजीत पाटील यांनी केले. तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

Related Posts

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
Next Post
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us