मनवेल ता.यावल (वार्ताहर ) – येथुन जवळच असलेल्या थोरगव्हाण येथील जानकीराम नामदेव पाटील यांच्या खळ्यातील चाऱ्याला आग लागली असे गावात समजताच गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली परंतु अतोनात प्रयत्न करून आग विझत नसल्यामुळे पोलीस पाटील गजानन चौधरी यांनी यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्याशी संपर्क साधून यावल नगर पालीकेचा अग्निशामक यंत्रणा बोलवण्यात आली.गाडी येते तोपर्यंत आग इतकी वाढली की मारुती नामदेव पाटील यांचे चाऱ्याने भरलेले शेड व बैलगाडी व इतर शेती अवजारे जळून खाक झाले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. घटनास्थळी तलाठी एस. एस. तायडे यांनी नुकसानाच्या पंचनामा केला आहे. गावकऱ्यांनी सहकार्य केल्याने सुदैवाने जीवित हानी टळळी असुन चाऱ्या , शेतीचे अवजारे, बैलगाडी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.