जळगाव,(प्रतिनिधी)- तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा. मी तुमचे जे कारणानामे काढले आहेत ते खरे ठरले आहेत. तुमचे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आहेत. आधी त्यांच्या चौकशी करून जनतेसमोर या असं आव्हानचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी महाजनांना दिलं असून आता जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
जामनेर नगरपालिके अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी का थांबली? असा सवाल एकनाथ खडसेंनी यावेळी केला असून भ्रष्टाचार करायचा आणि वरून लोकांना शिकवायचं? हे बरोबर नाही”, अशी टीका खडसेंनी केली.सर्व बोके एकत्र झाले तरी मी निवडून येऊन दाखवेन. जनता माझ्या पाठीशी आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “यांचा हेतू चांगला नाही. यांचा हेतू त्या दूध संघाला ओरबडणे हा आहे”, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.










