Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तारखेडा येथे पोलिसांचा छापा ; तब्बल २६ लाख ८६ हजारांचा अवैध गुटखा जप्त

najarkaid live by najarkaid live
February 4, 2023
in जळगाव
0
तारखेडा येथे पोलिसांचा छापा ; तब्बल २६ लाख ८६ हजारांचा अवैध गुटखा जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- तालुक्यातील तारखेडा येथे एका गोडावुन मध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती चाळीसगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार करत घटनास्थळी छापा टाकत पथकाने तारखेडा येथील एका गोडावुन मधुन तब्बल २६ लाख ८६ हजार ३६८ रुपयांचा अवैधरित्या साठवुन ठेवलेला गुटखा जप्त करत एका आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आले असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चाळीसगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना गुप्तचरा कडुन माहिती मिळाली की, तारखेडा ता. पाचोरा येथील एका गोडावुन मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साठा करुन ठेवला आहे.

अभरसिंह देशमुख यांनी तात्काळ पोलिस काॅन्स्टेबल अजय अशोक पाटील, महेश अरविंद बागुल, पोलिस नाईक राजेंद्र अजबराव निकम असे पथक तयार करुन रात्री ८ वाजेच्या सुमारास तारखेडा गाठले. गावात पोहचल्यानंतर एक – एक गोडावुन तपासत करत असतांना एका गोडावुन समोर एक इसम बसलेला आढळून आला. पथकाने इसमास विचारपूस केली असता त्याने अनिल काशिनाथ वाणी रा. तारखेडा ता. पाचोरा असे सांगितले. पथकाने गोडवुनची तपासणी केली असता घबाळ बाहेर आले. गोडावुन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखाजन्य माल मिळुन आला. अभयसिंह देशमुख यांनी अनिल वाणी यास विचारले की, सदरील माल कोणाचा आहे ? त्यावर अनिल वाणी यांनी सांगितले माल हा दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ एकनाथ वाणी यांचा असुन मी फक्त याठिकाणी विक्री करतो.

अभयसिंह देशमुख यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला खबर देवुन घटनास्थळी दाखल होण्याच्या सुचना दिल्या. तद्नंतर तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे, सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी दाखल होवुन पो. उ. नि. जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अवैधरित्या गुटख्याच्या साठ्यासह अनिल वाणी यास ताब्यात घेत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आणले. जप्त करण्यात आलेल्या मालात १८ लाख ६७ हजार रुपये किंमतीची विमल पान मसालाचे ४८ पोते त्यात एका पोत्यात २०८ पाकीटे व पाकीटात २२ पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत ८.५ रुपये, ९ हजार ९०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाची तंबाखुच्या ९ गोण्या एका गोणीत ४५० पाकिटे व एका पाकिटात ११ पाऊच एका पाऊचची किंमत २ रुपये, ४ लाख ९९ हजार २०० रुपये किंमतीची राज निवास सुगंधीत पान मसालाचे १३ पोते प्रत्येक पोत्यात २०० पाकिटे व एका पाकिटात ४८ पाऊच एका पाऊचची किंमत ४ रुपये, २ लाख ५४ हजार १०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाच्या तंबाखुच्या ७ गोण्या एका गोणीत १ हजार ६५० पाकीटे व एका पाकिटात २२ पाऊच एका पाऊचची किंमत १.५ रुपये, ५६ हजार १६० रुपये किंमतीचे सागर पान मसालाचे २ पोते प्रत्येक पोत्यात १३० पाकिटे व एका पाकिटात १२ पाऊच एका पाऊचची किंमत १८ रुपये असा एकुण २६ लाख ८६ हजार ३८६ रुपयांचा अवैधरित्या साठवुन तसेच विक्रीसाठी ठेवलेले राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला पोलिसांनी हस्तगत केला आहे.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन अनिल वाणी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी अद्याप फरार असुन त्यांचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करित आहे. या धडक कारवाईमुळे पाचोरा शहरासह परिसरातील अवैध गुटख्याची साठवुन व विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बनावट कागदपत्रे बनवून करत होते मालमत्ताची खरेदीविक्री, पण.. जळगावात धक्कादायक प्रकार उघड

Next Post

पाचोऱ्यात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोऱ्यात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

पाचोऱ्यात शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us