Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर जळगावच्या विकासाठी आणखी १०० कोटी देणार – मुख्यमंत्री  

najarkaid live by najarkaid live
August 23, 2019
in जळगाव
0
तर जळगावच्या विकासाठी आणखी १०० कोटी देणार – मुख्यमंत्री  
ADVERTISEMENT
Spread the love

  • ईव्हीएमच्या नावाखाली विरोधकांकडून बोंबा मारण्याचे काम 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावातील सभेत विरोधकांवर कडाडून टीका
  • …तर जळगावच्या विकासाठी आणखी १०० कोटी देणार 
  • शेतकऱ्यांना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी 
  • विरोधकांना सत्तेची मुजोरी
  • सामान्य माणसांचा विकास करणे हाच आपला अजेंडा

जळगाव ;- सत्तेत नसताना संघर्ष यात्रा काढतो .  तर सत्तेत असताना संवाद यात्रा काढतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगावत आयोजित सागर पार्क येथील महाजानदेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत केली . विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत ईव्हीएमला दोष देण्याचे काम करीत आहे. विरोधकांना सत्तेची मुजोरी आली  होती . १५ वर्ष जनतेने सत्ता दिली होती . त्यांनी आपली संस्थांचा कारभार हाकण्याचा प्रयत्न केला . जनता आता त्यांना साथ देण्याच्या मानसिकतेत नाही . आता प्रत्येकाला वाटू लागले आहि कि नरेंद्र मोदी यांच्या शिवाय विकास भारताचा होणार नाही अशी परिस्थिती राहिली असून पाच वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी यांना डावलून जनतेने मूल्यमापन करून हेच भाजपचे सरकार प्रश्न सोडवू शकतात . देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आम्ही दिली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी यावेळी केला. आघाडी सरकारच्या काळात शेतकर्याना १२०० कोटींची मंदत दिली जात होती . मात्र भाजपच्या काळात ५० हजार कोटींची मदत शेतकर्याना केली आहे. दुष्काळ असो कि महापूर सरकारने प्रत्येक  मदत केली आहे. सर्वात जास्त रस्ते ना. गडकरींनी आपल्या काळात केली असून १८ हजार गावांना पाणी योजनांची कामे पूर्ण केली आहे. . यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन , माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, आ. हरिभाऊ जावळे , खा. उन्मेष पाटील, आ. स्मिता वाघ, गुरुमुख जगवाणी, आ. राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे , माजी खासदार ए. टि. पाटील  राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, आ. चंदू पटेल , सुजीती ठाकूर , ,मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे,नगरसेवक कैलास सोनवणे,विशाल त्रिपाठी ,दीपक साखरे आदी यावेळी  उपस्थित होते . पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कि ,  खान्देशचा परिसर हा आमच्या पाठीशी वर्षानुवर्षे पाठीशी राहायला आहे . एकट्या जळगाव शहराचा विचार केला असता वेगवेगळ्या माध्यमातून १ हजार १० कोटी जळगाव शहराला निधी मिळाला आहे . एवढा निधी २५ वर्षात मिळाला नाही तो मिळवून दिला आहे. हुडकोच्या पाठीशी लागून निधी मिळवून हुडकोच्या कर्जातून मुक्त केले आहे . १०० कोटी अमृत योजनेसाठी दिले असून रस्त्यांसाठी १०० कोटी निधी देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. राजू मामा भोळे यांना उद्देशून दिले. झोपडपट्टी धारकाचे ज्या जागेत अतिक्रमण असेल त्याला तोच प्लॉट देण्यात येऊन घर बांधण्यासाठी साडेचार लाख देण्यात येत आहे . सामान्य माणसांचा विकास करणे हाच आपला अजेंडा असल्याचे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले . मराठा आरक्षण , धनगर समाजाला हजार कोटी देणे असो कि ओबीसी समाजाला आरक्षण देणे असो भाजपाने विकासकामे केली आहे . जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा झेंडा फडकविला आहे. कासमीरमध्ये तिरंग्याला सन्मान मिळत नव्हता . नरेंद्र मोदींनी ३७० कलम हटवून तो सन्मान मिळवून दिला आहे. मोदींच्या नेतृत्वात बलशाली राष्ट्र होत असून महाराष्ट्र समृद्ध बनविण्यासाठी तुमचा जनादेश मला हवे आहे . तुमचा आशीर्वाद आहे का,हाच जनादेश समजून मुंबईला जातो . आणि पुन्हा विधानसभेवर झेंडा फडकवून जळगावकरांचे आभार व्यक्त करण्यासाठी येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेतील आपले भाषण संपविले.

पुढचे येणारे सरकार आपले असणार – ना. गिरीश महाजन 

जळगाव ;- महाजनादेश यात्रा पाहून विरोधकांना वेगवेगळी यात्रा काढण्यात येत आहे . राष्ट्रवादीची अवस्था फार वाईट झाली असून काँग्रेस तर व्हेंटिलेटरवर आहे अशी टीका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली . विरोधकांची अवस्था डुगडुगी सारखी झाली . ४० जाणही ते निवडून आणू शकत नाही अशी अवस्था झाल्याचे सांगत विरोधकांची ना. महाजन यांनी खिल्ली उडविली . आगामी सरकार हे भाजपचे असणार असल्याचे त्यांनी छातीठोकपणे सांगितले . जळगाव लोकसभा मतदार संघासाठी जनतेने भरभरून मतदान केले असून मी त्यांचे आभार मानतो असे सांगत आपल्या भाषणाचा समारोप केला . तसेच जळगाव जिल्ह्यात विविध विकासकामांनि वेग घेतला आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मामा नाही तर मामींना तिकीट मिळणार 

यापुढे ना. गिरीश महाजन म्हणाले कि , आ. राजूमामा भोळे हे जरा काळजीत दिसत असले तरी त्यांनी ती करून नये मामांना नाहीतर मामींना तिकीट दिले जाईल असे सांगताच सभेत हंशा पिकला .

यावेळी आ. राजूमामा भोळे यांच्याकडून १ लाख ५१ हजार ,महापौर सीमा भोळे यांनी १ लाख रुपये तर सुनिल झंवर यांनी ११ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षा मीना चौधरी , अक्षय चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनगर समाजातर्फे फेटा आणि घोंगडी देऊन माजी महापौर सदाशिवराव ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी प्रास्ताविकातून मुख्यमंत्र्यानी जळगाव शहराच्या विकासासाठी जो निधी आणला त्याबद्दल मुख्यमंत्र्याचे आभार मानले. तसेच मुख्यमंत्र्यानी गाळेधारकांच्या चार पट दंडाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी केली . हुडकोचे कर्ज माफीचा निर्णय घेतला तो अतिशय सुखद धक्का असल्याचे आ. भोळे यांनी सांगितले . अमृत योजना असो कि भुयारी गटारी यांचे प्रश्न आता मार्गी लागले असून ८०० कोटींचा निधी विविध विकास कामांच्या माध्यमातून झाले आहे. गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेत ५७ नगरसेवक निवडून आणले . त्यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा शब्द दिला होता तो त्यांनी पाळला असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बहूळा धरणाचे कृष्णा सागर नामकरण होणार – आ.किशोरअप्पा पाटील

Next Post

गर्विष्ठ भाषेची आमदारांना उशिरा उपरती झाली – माजी आ. दिलीप वाघ 

Related Posts

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

July 28, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 27, 2025
Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

Bangladeshi Woman Trafficking | जळगावमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश !

July 25, 2025
Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

Bhusawal Railway Route Change | भुसावळ विभागातील रेल्वे मार्गात बदल, प्रवाशांनी नोंद घ्या!

July 25, 2025
Doctor blackmail case Pachora : पाचोऱ्यात डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

Doctor blackmail case pachora : डॉक्टरला अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी, 2 कोटींची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

July 25, 2025
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana Application Process

July 25, 2025
Next Post
गर्विष्ठ भाषेची आमदारांना उशिरा उपरती झाली – माजी आ. दिलीप वाघ 

गर्विष्ठ भाषेची आमदारांना उशिरा उपरती झाली - माजी आ. दिलीप वाघ 

ताज्या बातम्या

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

July 28, 2025
Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

Google Pixel 10 Launch event : Made by Google इव्हेंटमध्ये एकाचवेळी चार नवे स्मार्टफोन

July 28, 2025
10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

10 Minute Loan : १० मिनिटांत कर्ज मिळवा: खरे की खोटं?

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

weekly Rashi bhavishya: आज श्रावण सोमवार – या आठवड्याचे तुमचं राशीभविष्य कसं असेल जाणून घ्या

July 28, 2025
Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us