जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहर विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ शहरातील बजरंग पुलाजवळ असलेल्या नवसाच्या गणपतीला नारळ वाहून आज बुधवार (ता.०६) रोजी करण्यात आला.यावेळी डॉ. अश्विन सोनवणे यांचे वडील शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे यांच्यासह मोठया संख्येने समर्थक कारकर्ते उपस्थित होते.
प्रचार रॅलीतून होम टू होम प्रचार
भाजपावर नाराजी व्यक्त करत बंडाचा झेंडा हाती घेऊन डॉ. अश्विन सोनवणे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत आज पासून शहरात जल्लोषात प्रचार सुरु केला आहे. शहराच्या विकासासाठी उमेदवारी करत असल्याचं अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे यांनी सांगितलं. प्रचाराच्या पहिल्याचं दिवशी अश्विन सोनवणे यांनी होम टू होम प्रचार करत प्रचारात आघाडी घेतली.









