Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा

najarkaid live by najarkaid live
November 30, 2021
in Uncategorized
0
ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई,दि. २९ – ठाणे येथील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे रूपांतर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी २१३ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आधीचे ३१४ आणि आताचे २१३ असे ५२७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे या रुग्णालयाचे काम आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून तिथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या मागणीचा सतत पाठपुरावा करून अखेर या रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधी मिळवून त्यांनी या रुग्णालयाच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

ठाण्यातील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. तसेच याठिकाणी अद्ययावत रुग्णालयात उभारण्यासाठी ३१४ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर याजागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी अतिरिक्त २१३ कोटी रुपयांची गरज होती. आज झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या सुधारित रक्कमेला मान्यता मिळाली आहे.

९०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार

जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी ९०० बेडसचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार असून त्यात २०० मेटर्निटी, २०० सुपर स्पेशालिटी बेडस असतील तर उर्वरित ५०० बेडस हे सर्वसाधारण बेडस असणार आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात दोन स्वतंत्र आयसीयू उभारण्यात येणार आहेत. या रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार असून तिथे युरोलॉजी, अंकोलॉजी, ओंको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी, कार्डिओ व्हॅस्कुलर सेक्शन, नेफ्रॉलॉजी आणि डायलिसिस अशा सगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कर्करोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबधित आजार तसेच हृदयरोगावर उपचार घेणे शक्य होणार आहे. याशिवाय या रुग्णालयात वैद्यकीय तासिका घेण्यासाठी खास थिएटर, ट्रेनिंग हॉल इतकेच नव्हे तर रुग्णाला एअर लिफ्ट करून आणण्यासाठी हेलिपॅडची सुविधा देखील असणार आहे. तीन बेसमेंट आणि वर दहा मजल्याच्या दोन इमारती याजागी उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही इमारतींना जोडण्यासाठी सातव्या मजल्यावर एक पूल देखील असेल. तसेच वजनदार मशिन्स ठेवण्याची सोय या इमारतीच्या बेसमेंट सेक्शनमध्ये करण्यात येईल.

ठाणे सर्वसाधारण रुग्णालयाची सध्याची क्षमता ३०० खाटांची आहे. त्यातही ठाणे, पालघर येथील लाखो रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. या दोन्ही जिल्ह्यांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे जुने रुग्णालय कमी पडू लागले आहे. त्यामुळे लोकांची वाढती गरज लक्षात घेऊन उभारण्यात येणारे हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय रुग्णासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, हेमंत पवार यांनी या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुसार पूर्वी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तर अलिकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या. श्री. शिंदे यांच्याकडे काही काळ आरोग्य मंत्रिपदाचा कार्यभार असताना त्यांनी या प्रस्तावाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता या रुग्णालयाच्या उभारणीसाठी लागणारा निधी मंजूर झाल्यामुळे लवकरात लवकर या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन तर्फे गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

उद्यापासून राज्यातील शाळा सुरु ; शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Related Posts

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

July 30, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

July 29, 2025
UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

July 27, 2025
Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

July 27, 2025
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य | Daily Horoscope Today (22 जुलै 2025)

July 22, 2025
Next Post
उद्यापासून राज्यातील शाळा सुरु ; शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

उद्यापासून राज्यातील शाळा सुरु ; शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या बातम्या

Trump New Visa Policy 2025: ट्रंप सरकारच्या नव्या व्हिसा धोरण, नवीन नियम लागू

Trump New Visa Policy 2025: ट्रंप सरकारच्या नव्या व्हिसा धोरण, नवीन नियम लागू

July 30, 2025
PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

PM Crop Insurance Kharif 2025: प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण!

July 30, 2025
Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

July 30, 2025
Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

July 30, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 – जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस

July 30, 2025
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us