Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टरबूज पिकातून साधलीआर्थिक सुबत्ता वरखेडे मधील भीमसिंग खंडाळे यांची आधुनिक शेतीतील वाटचाल

najarkaid live by najarkaid live
May 25, 2019
in शेती
0
टरबूज पिकातून साधलीआर्थिक सुबत्ता  वरखेडे मधील भीमसिंग खंडाळे यांची आधुनिक शेतीतील वाटचाल
ADVERTISEMENT
Spread the love

पाणी कमी म्हणून रडत बसण्यापेक्षा आहे त्या पाण्यात आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत मेहनत, जिद्द आणि उत्कृष्ठ नियोजनाच्या बळावर टरबूज पिकातून मोठी उलाढाल करीत आर्थिक सुबत्ता साधता येते; याचा आदर्श घालून देणारे चाळिसगाव तालुक्यातील वरखेडे बु. येथील शेतकरी भीमसिंग रामसिंग खंडाळे यांच्या शेतीविषयी…

चाळीसगाव तालुक्यात तसे पाण्याचे दुर्भिक्ष.वरखेडे गावातही पाण्याची कमतरता आहेच. पाणी कमी असतानाही जैन ठिबक, तंत्रज्ञानाच्या मदतीने जैन टिश्युकल्चर रोपांद्वारे केळीची आधुनिक शेतीचा मार्ग भीमसिंग खंडाळे यांनी शोधला. केळी सोबतच आंतरपिक म्हणून टरबूज लागवडीचा खान्देशात पहिलाच अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला.आंतरपिक म्हणून टरबूज लावल्याने केळीवर व्हायरस येईल, अशी भिती त्यांना दाखविण्यात आली. मात्र योग्य नियोजन आणि जैन टिश्युकल्चर रोपांच्या गुणवत्तेमुळे त्यावर कोणताही व्हायरस आला नसल्याचे भीमसिंग खंडाळे सांगतात.

अवघ्या 60 दिवसातील खात्रीचे उत्पन्न

वरखेडे शिवारात भीमसिंग खंडाळे यांची वडिलोपार्जित दोन एकर 14 गुंठे शेतजमीन आहे. तसेच करार (कसावर) पद्धतीने त्यांनी मेहुणबारे, वडगाव,वरखेड याठिकाणी सुमारे 17 ते 18 एकर शेती केली आहे. यामधील 13 एकर शेतात त्यांनी टरबूजची लागवड केली आहे. या संपूर्ण शेतात ठिबक संचाद्वारेच सिंचन केले जाते. उत्तम वाणाची निवड, विद्राव्य खते,ठिबक, मल्चिंग पेपरचा वापर तसेच आधुनिक व एकात्मिक व्यवस्थापन या सर्वांचा नियोजनबद्ध अवलंब केल्याने पाच एकर मध्ये 85 टन टरबुजचे उत्पादन घेतल्याचे ते सांगतात. सालदार, मजुरांचा खर्च,लागवडीसाठी लागलेला खर्च वगळता यातुन तीन ते साडेतीन लाखांचा नफा मिळाल्याचेही सांगतात. त्यांच्या शेतातील वैशिष्ट्ये म्हणजे साडेतीन ते चार किलोच्यावर एक टरबुज. जानेवारीला लावलेली टरबुजची बाग आता काढणीवर आहे. लागवडीपासून अवघ्या 60 ते 90दिवसात टरबूज पिकाचे उत्पन्न मिळत असल्याने शेतीसाठी लागणारा खर्च भागवता येत असल्याने उसनवारी करण्याची गरज पडत नाही आणि वेळेवर व्यवस्थापन करता येते.

टरबूज पिकाचे व्यवस्थापन

जेथे थोडेफार का पाणी होईना तिच शेती करारपद्धतीवर कसण्यासाठी भीमसिंग खंडाळे घेतात. ठिबकसिंचन चे फाऊंडेशन उभे केल्यानंतर तेथे सहा बाय एक यापद्धतीने टरबुजची लागवड केली आहे. कीडव्यवस्थापनासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचेखंडाळे सांगतात. त्यासाठी ठिकठिकाणी सापडे लावलेआहेत. ठिबकमुळे थेट मुळांशी खते देता येत असल्यानेउत्पादनात पारंपरिक पद्धतीपेक्षा वाढ झाल्याचे ते अभिमानेसांगतात. मल्चिंग पेपरमुळे तणांवर नियंत्रण, बाष्पीभवनकमी होत असल्याने शेतातील तापमान नियंत्रणात राखतायेते.

ठिबकमुळे टरबुजच्या गुणवत्तेत वाढ

पाण्याचे नियोजन काटेकोर करण्यासाठी ठिबकसिंचन हेच एकमेव तंत्र ते अवलंबवितात. ठिबकमुळे पाणीथेट मुळांपर्यंत पोहचते. पाण्याच्या समदाबामुळे रोपांची वाढसारखी होते शिवाय एकसारखे टरबुजांचा दर्जाही उत्तम होते.उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यात वाढ होत असल्याने ठिबकशेतकऱ्यांसाठी वरदानच असल्याचे भीमसिंग खंडाळेसांगतात.

मोबाईलद्वारे फळ बागेला पाणी

वरखेड परिसरातील पंधरा किलोमिटर अंतरामध्येभीमसिंग खंडाळे शेती करतात. ते स्वतः त्यांची पत्नीरंजनाबाई यांच्यासह एक सालदार यांच्या माध्यमातून शेतीचे व्यवस्थापन करतात. मात्र वारंवार खंडीत होणारा विजपुरवठायामुळे शेतात पाणी व्यवस्थीत देता येत नाही. यावर कायमचाउपाय म्हणून ऑटोस्विच बसवून मोबाईल आटोद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जेणे करून शेतावर पोहचण्याच्याआधीच पिकाला पाणी देता येते. यातुन वेळ, पैसा आणिश्रमाची बचत होते. अत्याधुनिक असलेली जैन ऑटोमेशनही यंत्रणा बसविण्याचा त्यांचा मानस आहे मात्र स्वतःचे क्षेत्रफक्त दोन एकर 14 गुंठे असल्याने त्यावर मर्यादा असल्याचे तेसांगतात.

रोजगार निर्मितीला हातभार

शेतकऱ्यांनी कठिण परिस्थितीत स्वतःला सावरूनकोणाचीही मदत न घेता आपल्या कामात सातत्य ठेवले तरशेती यशस्वी करता येते. पारंपरिक शेतीतून अवघ्ये 10 हजाररूपये उत्पन्न मिळत असल्याचा अनुभव गाठी असल्यानेत्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आणि लाखो रूपयांचीउलाढाल केली. बाजाराच्या आवश्यकतेनुसार पीकपद्धतीतबदल करून व्यापाराला शेतात चांगल्या दर्जाचा माल तेदेतात. यातुन गावातील सुमारे शंभर जणांना रोजगारमिळाल्याचे समाधान असल्याचे ते सांगतात. शिवाय तीनमुलींचे मोठ्याथाटात विवाह समारंभ करता आले. मुलगानिखील हा डी.फार्मसी करीत आहे. चांगले घर, शेतीसाठीट्रॅक्टर, समाजात प्रतिष्ठा ही फक्त काळ्या आईच्या सेवेतूनमिळाले. आधुनिक शेतीची कास धरण्यासाठी चांगले ज्ञान,तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रगतीशिल शेतकऱ्यांची सोबत घेतलीपाहिजे, असे सांगत जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञके. बी. पाटील आणि सागर किंगचे भगवान पाटील यांचेवेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःदेखील तंत्रज्ञान वापरून शेती कसण्यासाठी शेतकऱ्यांनाप्रोत्साहन देत असल्याचे ते सांगतात. अलिकडेच कृषिक्षेत्रातमानाचा समजला जाणारा अमितसिंग फाऊंडेशनचा पुरस्कारगिरीराज सिंह, डॉ. एच. पी. सिंग यांच्याहस्ते बिहार येथेमिळाल्याचे ते अभिमानाने सांगतात.

“शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरावी. बाजारातील मागणी हेरून चांगले काय आहे ते निरीक्षण करून आत्मसात करावे आणि शासनाच्या मदतीची अपेक्षा न करताच स्वतःच उभे राहावे, जेणे करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करता येईल. यासाठी चांगल्या शेतकऱ्यांशी संगत केली पाहिजे.”

–    भीमसिंग रामसिंग खंडाळे,

शेतकरी, वरखेडे बु. ता. चाळीसगाव

मोबा- 9561636780

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव येथे  महिलेचे मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबवीले

Next Post

आ. चंदूभाई पटेल व आ. राजूमामा भोळे यांच्या कडून शिवाजी नगर पूलाच्या कामाची पाहणी !

Related Posts

PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

July 15, 2025
Fall Armyworm

Fall Armyworm Attack | जळगावमध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला!

July 7, 2025
जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेत जैन इरिगेशनची उत्कृष्ट कामगिरी

February 26, 2025
अर्थसंकल्पात उघडणार शेतकऱ्यांसाठी ‘निधी पेटी’, जाणून घ्या सविस्तर

PM Kisan : शेतकऱ्यांनो, हे काम लवकर पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 16 वा हप्ता

January 24, 2024
देशातील लाखो शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार, सरकारचे नवीन पोर्टल सुरू

देशातील लाखो शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार, सरकारचे नवीन पोर्टल सुरू

January 5, 2024

कृषी विक्रेत्यांचा भुसावळ शहर व तालुक्यात कडकडीत बंद

November 3, 2023
Next Post
आ. चंदूभाई पटेल व आ. राजूमामा भोळे यांच्या कडून शिवाजी नगर पूलाच्या कामाची पाहणी !

आ. चंदूभाई पटेल व आ. राजूमामा भोळे यांच्या कडून शिवाजी नगर पूलाच्या कामाची पाहणी !

ताज्या बातम्या

Padmalaya Storage Tank Project  

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

July 18, 2025
Jalgaon News Today

जळगाव जिल्ह्यातील आजच्या २० महत्वाच्या बातम्या वाचा – Top 20 Jalgaon News Today

July 18, 2025
Maintenance and Welfare of Parents Act 2007

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

July 18, 2025
Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation

Veer Shiromani Maharana Pratap Economic Corporation: राजपुत समाजासाठी ₹200 कोटींच्या भांडवली मदतीची विधिमंडळात मागणी

July 18, 2025
Taekwondo Zonal Tournament उद्घाटन अनुभूती स्कूल जळगाव

अनुभूती स्कूलमध्ये Taekwondo Zonal Tournament – सात जिल्ह्यांचे ६० खेळाडू सज्ज

July 18, 2025
Ladki Bahin Yojana ;  राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us