जळगावच्या शिरसोली रोडवर असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क मध्ये आता नव्याने व्हेवपुल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता समुद्राच्या लाटांचा अनुभव येथे घेता येणार आहे. दरम्यान वॉटर पार्कचे संचालक नीरज जेसवानी यांनी सपत्निक व्हेव पुलची पुजा केली. यानंतर ग्राहकांनी इतर राईडस् बरोबरच व्हेव पुल मध्ये खेळण्याचा आनंद घेतला. वॉटर पार्कमध्ये व्हेव पुल हे विशेष आकर्षण ठरत असून यंदा सर्व ग्राहकांना पाण्यात समुद्राच्या लाटांचा अनुभव देखील घेता येत आहे.
दरम्यान बच्चे कंपनीसह अबालवृद्ध पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहेत. वॉटर पार्क मध्ये व्हेव पुल सुरू झाल्याने आता पाण्यात खेळण्याचा आनंद द्विगणित झाला असून जास्तीत जास्त नागरिकांनी वाटर पार्क ला भेट देण्याचे आवाहन संचालक नीरज जेसवानी यांनी केले.









