उपोषणास बसलेले शिक्षक व महिला शिक्षिका व आदी
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील औद्योगिक वसाहत येथील झिपरू अण्णा विद्यालयाचे चार शिक्षक शिक्षिका यांनी न्याय मिळत नसल्याने संस्थाचालक मुख्याध्यापक व शिक्षक विभागाच्या विरुद्ध आज दिनांक 14 मार्च रोजी सकाळी अकरा वाजे पासून जिल्हा परिषद इमारत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत उपोषणकर्ते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोणतेही ठोस कारण नसताना शिक्षक शुभम संजय पाटील काजल युवराज राजपूत पद्मा महादू राठोड राहुल भरत सिंग जाधव या चारही शिक्षकांना संस्थाचालक व मुख्याध्यापिका सौ सुरेखा येवले यांनी सेवे पासून वंचित ठेवले याचाही शिक्षकांना विद्यालयात आपल्या सेवेचे कर्तव्य बजावण्यासाठी मज्जाव केला व आपमानित करून शाळेतून हाकलून लावले त्याच बरोबर शिक्षक व महिला शिक्षक तिची बदनामी होईल असे आरोप केले कुठलेही लेखी आदेश न देता गेल्या नऊ महिन्यांपासून सेवेपासून वंचित ठेवले याबाबत वेळोवेळी संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षण विभाग सोबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कुठलाच न्याय मिळत नसल्याने होऊन अखेर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. तरी या चारही शिक्षकांना तात्काळ सेवेत रुजू करणे सेवेत रुजू झाल्यापासून संस्थाचालकांनी वेतन अदा केले नाही ते त्वरित मिळावे संस्थाचालकांनी केलेल्या बदनामीच्या बाबत माफीनामा लेखी स्वरूपात द्यावा विद्यार्थ्यांवर दबाव टाकून जो मर्जीप्रमाणे मजकूर लिहून घेतला त्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे माफी मागावी महिला शिक्षक यांची खोटी बदनामी केली म्हणून संस्थाचालक यांची चौकशी करण्यात यावी व कुठलेही ठोस कारण नसताना गेल्या नऊ महिन्यांपासून खुलासा संस्थाचालकांनी करावा या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे कळविले आहे. यावेळी उपोषण स्थळी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांच्या प्रमुख अधिक वेळा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला दरम्यान उपोषणास पालक व विद्यार्थी वर्गाने उपस्थित देऊन पाठिंबा दर्शविला आहे.