Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशन व फार्मफ्रेश फुडस लि.च्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ!

najarkaid by najarkaid
May 30, 2019
in राज्य
0
जैन इरिगेशन व फार्मफ्रेश फुडस लि.च्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ!
ADVERTISEMENT

Spread the love

जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फुडसचे वार्षिक आर्थिक निकाल जाहीर : ५ हजार कोटींच्या ऑर्डर्सची नोंदणी

जळगाव दि. ३० : पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळी परिस्थिती असताना जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व सहयोगी कंपन्यांनी वार्षिक आर्थिक निकालात देशांतर्गत व्यवसायापेक्षा देशाबाहेरील व्यवसायात चांगली कामगिरी केली आहे. त्या बळावर कंपन्यांच्या एकत्रित वार्षिक उत्पन्नामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे केंद्रात नव्या सरकारने कारभार हाती घेतला आहे, या सरकारचे कृषी विषयक धोरण सकारात्मक असल्याने आणि येत्या काही दिवसात सुरू होणारा पावसाळा चांगला राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती चांगली राहील, त्यामुळे निश्चितच कंपन्यांच्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावणार आहे. कंपनीच्या हाती जागतिकस्तरावरील ५ हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर्सची नोंदणी झाली असल्याचे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जैन फार्मफ्रेश फुडस लि.च्या भारतातील व परदेशातील कंपन्यांचे ३१ मार्च २०१९ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षण केलेल्या आर्थिक निकालात जाहीर करण्यात आले.

भारतातील सर्वात मोठी सुक्ष्म सिंचन आणि जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाची सुक्ष्म सिंचन कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जगातील आंबा प्रक्रिया उद्योगात प्रथम क्रमांकाची कंपनी जैन फार्मफ्रेश फुडस लि. यांनी एकत्रित जाहीर केलेल्या आर्थिक निकालांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे.

  • जैन इरिगेशन सिस्टिम्स व समुहातील कंपन्यांच्या एकत्रित उत्पन्नात ९.८३ टक्क्याने वाढ होऊन ते ८८४८.३ कोटी रुपये झाले.
  • सर्व कंपन्यांच्या एकत्रित करव्याज घसारापूर्व नफ्यात ९.१८ टक्क्याने वाढ झाली आणि तो १२५७.७ कोटी रुपये झाला आहे.
  • एकत्रित कंपन्यांच्या करपश्चात नफ्यात १४.८७ टक्क्याने वाढ झाली असून तो २५४.२ कोटी झाला आहे.
  • कंपनीच्या हाती जागतिकस्तरावरील ५१५२ हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर्सची नोंदणी झाली आहे.

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपन्यांचे लेखापरिक्षित आर्थिक परिणाम जाहीर करताना आनंद होतो आहे. कंपन्यांनी एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ नोंदवली आहे आणि नफ्याचे मार्जीन कायम राखले आहे. देशांतर्गत व्यवसायाच्या तुलनेत देशाबाहेरील व्यवसाय हा जास्त वाढ दर्शवणारा होता. चौथ्या तिमाहीत भारताच्या ग्रामीण भागात दुष्काळ होता आणि कठीण तरलता परिस्थितीमुळे सुक्ष्म सिंचन प्रणालींच्या विक्रीतील वाढीवर परिणाम झाला. तसेच काही प्रकल्पातील पुरवठा लांबणीवर पडल्यामुळे प्लास्टिकचा व्यवसाय कमी झालेला दिसतो. आमची उपकंपनी जैन फार्मफ्रेश फुडसने अपेक्षेनुसार चांगली वाढ नोंदवली आहे. येणारा पावसाळा चांगला होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे आणि नवीन सरकारचे कृषी विषयक धोरण देखील सकारात्मक असल्याने कंपनी अपेक्षित असलेल्या प्रगतीकडे वाटचाल करणार आहे.

–    अनिल जैन

उपाध्यक्ष- जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.जळगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव तालुक्यातील बात्सर ते खेडगाव रस्त्याचे काम निकृष्ट!

Next Post

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगांव जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा 

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगांव जिल्हा काँग्रेसतर्फे मोर्चा 

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us