Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार

जैन इरिगेशन ही कॉफीचे टिश्यूकल्चर विकसीत करणारी जगातील पहिली कंपनी 

najarkaid by najarkaid
August 25, 2024
in Uncategorized
0
जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, २४ ऑगस्ट (प्रतिनिधी) :-  टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून जागतिक पातळीवर ठसा उमटविणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने आता कॉफी पिकामध्ये टिश्यूकल्चर तंत्रज्ञान विकसीत केले आहे. याच श्रृखंलेत आता टिश्यूकल्चर पद्धतीने कॉफी रोपांची उपलब्धता व्यावसायीक तत्त्वावर केली जाणार आहे. यासंबंधीचा  सामंजस्य करार भारत सरकारच्या कॉफी बोर्डासोबत नुकताच करण्यात आला. याअंतर्गत रोबस्टा आणि अरेबिका कुळातील उच्च उत्पन्न देणाऱ्या कॉफीच्या सात वाणांची टिश्यूक्लचर पद्धतीने निर्मित रोपांची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसा परवाना भारत सरकारच्या कॉफी बोर्डाने जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडला बहाल केला आहे.

भारत हा जगात कॉफी उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश असून टिश्यूकल्चरच्या रोपांमुळे निर्यातक्षम उत्पादनाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी करारावेळी व्यक्त केला. या करारामुळे भारतातील कॉफी उद्योगात क्रांती घडून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल.

जैन टिश्यूकल्चर कॉफी रोपे ही गुणवत्तापूर्ण मातृवृक्षांपासून तयार केली जातात. उच्च उत्पन्न, उत्कृष्ट सुगंध गुणवत्ता आणि रोपांचा संतुलित घेर व आकार या परिमाणांवर निवडलेली असतात. टिश्यूकल्चर निर्मित कॉफी रोपे ही व्हायरस फ्री, कार्यक्षम आणि अनुवंशिकदृष्ट्या एकसारखी असतात. कॉफीच्या शाश्वत शेतीसाठी टिश्यूकल्चर रोपांची लागवड नक्कीच उपयुक्त ठरेल. सध्या जैन इरिगेशन केळी, डाळिंब आणि संत्रा यांची टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे यशस्वीरित्या तयार करून पीक शाश्वतीच्या उपायांमध्ये अग्रेसर आहे. या रोपांमुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे उत्पादन होऊन आर्थिक स्थिरता आली आहे.

भारतात सध्या जुन्या पद्धतीने कॉफी रोपांची लागवड करण्यात येते. यात दर्जेदार रोपे आणि प्रगत, तंत्रज्ञानाची उणीव जाणवते. त्यामुळे नविन विकसीत कॉफी टिश्यूकल्चर रोपांचे विविध फायदे कॉफी उत्पादकास मिळतील. यामुळे भारत व इतर देशांमध्ये कॉफी उद्योगाला निश्चित चालना मिळेल.

शेती अजूनही अनेक पातळ्यांवर अकार्यक्षम आहे. अजुनही शेतीमध्ये पारंपारिक पद्धतींचा वापर केला जात आहे. यामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स ही सतत शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अग्रेसर आहे. ही वचनबद्धता जैन इरिगेशनने हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येते. सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे या ध्येयाप्रमाणे काम सुरु असून टिश्यूकल्चर कॉफी रोपे हा जैन इरिगेशनने शेतकऱ्यांना समृद्धी देण्यासाठी तयार केलेला आणखी एक परिवर्तनकारी उपाय आहे.

“जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ला टिश्यूकल्चर निर्मित कॉफी रोपे जगासमोर आणताना अत्यंत अभिमान वाटतो आहे. रोगमुक्त, अनुवंशिकदृष्ट्या एकसमान आणि अधिकचे उत्पन्न देणारी, असे विविध वैशिष्ट्ये असलेली कॉफीची टिश्यूकल्चर रोपे भारतीय कॉफी उत्पादकांना समृद्धी देईल.”

  • अजित जैन,  सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. 

“जगात प्रथमच जैन इरिगेशनच्या माध्यमातून भारतात कॉफीसाठी टिश्यूकल्चर तंत्रज्ञान प्रमाणित केले आहे. या टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेल्या कॉफी रोपांचे शेतात मूल्यांकन केले गेले आहे. हे नवनिर्मित तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये निश्चितच नियमित वाणांपेक्षा खूप चांगले परिणाम दाखवत आहे. कॉफी बोर्ड, कॉफी उत्पादकांची असोसिएशन आणि व्यक्तीगत कॉफी इस्टेट मालकांच्यावतीने या कराराचे मी मन:पुर्वक स्वागत करतो. ’’

  • के. जी. जगदीशा, सचिव व सीईओ, कॉफी बोर्ड, भारत सरकार

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

Next Post

महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणार

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणार

महाविद्यालये आणि आयटीआय संस्थांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करणार

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us