Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा ; भाऊंचे उद्यानासमोर 500 किलो केळी वाटप

najarkaid live by najarkaid live
April 20, 2022
in जळगाव
0
जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा ; भाऊंचे उद्यानासमोर 500 किलो केळी वाटप
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव दि.20 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. यांच्यातर्फे भाऊंचे उद्यानाजवळ जागतिक केळी दिन साजरा करण्यात आला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले महत्त्व यावर विशेष चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते 500 किलो केळी वाटप करून दररोज ‘दोन केळी खा आणि निरोगी रहा’ हा आरोग्याचा मंत्र देण्यात आला.

भाऊंच्या उद्यानासमोर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ के. बी. पाटील, जळगाव केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजीव पाटील, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश देशमूख, जैन फार्मफ्रेश फूड्सचे किशोर रवाळे, सुदाम पाटील, एम. एन. महाजन, डॉ. विलास महाजन, सुरेश पाटील, दिनू चौधरी, सुनील लोढा, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. जे आर महाजन ,मोहन राठोड, मोहन पी. चौधरी, मिलींद पाटील, संजय फराटे, भास्कर काळे, अलका शिरसाट, प्रतिभा भोळे, शंकुतला ठोंबरे, वासंती फासे, उषा इखनकर,सुरेखा वाणी, रेखा पाटील,आशा नाईक, स्मिता शुक्ल,छाया पाटील,

मीनाताई शिरसाट, राजपूतताई पाटील, पुष्पा पाटील, सकूनसिंग ठाकूर, नीलिमा भंगाळे उपस्थित होते. जळगाव केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजीव पाटील, केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. गणेश देशमूख यांच्याहस्ते केळी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. सुरवातीला केळीचे महत्त्व के बी पाटील यांनी सांगितले. केळीची खाद्यसंस्कृती, केळीपासून बनणाऱ्या पदार्थांची माहिती दिली तसेच जागतिक केळी दिनाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. जागतिक केळी दिन 2017 पासून सर्वप्रथम युरोपीयन देशांमध्ये साजरा केला जात आहे. केळी दिवस साजरा करण्यामागील भूमिका अशी होती की, केळीमधील पोषकतत्त्वाचा विचार केल्यास सफरचंदापेक्षाही पाचपट जास्त पोषणमूल्य त्यात आहे.

केळी फळाबद्दल असलेले समजगैरसमज दूर केले पाहिजे. अतिशय सुरिक्षित असलेल्या केळीला नैसर्गिकरित्या संरक्षण आहे. केळीचा प्रचार-प्रसार व्हावा सर्वसामान्यापर्यंत या फळांविषयी माहिती मिळावी यासाठी जागतिक केळी दिवस साजरा केला जातो. केळीमध्ये पॉटेशिअम, फॉस्फरस, आर्यन, व्हीटॅमन बी-6, कॅल्शिअम असते. श्रम करणाऱ्यांना, खेळाडूंना स्फूर्ती देण्याचे काम केळी करते. कुपोषण दूर करण्यासाठी केळी ची महत्त्वाची असून त्याचे सेवन केले पाहिजे. विकसीत देशांमध्ये 30 ते 35 किलो दर डोई केळी खाल्ली जाते तर भारतात मात्र 12 किलो प्रति व्यक्ती केळी वर्षाला सेवन केली जाते.

केळी हे गरिबांचे फळ असून ते बहुगूणी आहे. केळीबद्दल आपल्याला पुर्ण ज्ञान नसल्याने पिवळी धमक केळी ही कार्बायीडमध्ये पिकवलेली असते असा गैरसमज आहे. मात्र पिवळी धम्मक केळी म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने पिकवलेली केली हे जगभरात समीकरण आहे.अमेरिका युरोप जपान मिडल ईस्ट अशा सर्वच देशात केळी इथीलिन गॅस वापरून पिकवली जाते. जी केळी पोषक मानली जाते आपल्या कडे उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र यासह संपूर्ण भारतात रायपनिंग चेंबरमध्येच केळी पिकवली जाते ही वस्तूस्थिती आजची आहे. पिवळीधमक केळी म्हणजे शास्त्रीय पद्धतीने पिकवली जाते. जागतिकस्तरावर केळीला अन्नघटकांपैकी महत्त्वाचे मानले जाते.

प्रवासामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि खाता येणारे सुरक्षित असे फळ आहे. जागतिक केळी दिनानिमित्त सकाळी नाश्ताला कचोरी, समोसा फास्ट फूड खाण्यापेक्षा दररोज दोन केळी खावी जेणे करून संभाव्य आजारांना दूर ठेवता येईल असा संकल्प करू या, असे आवाहन के. बी. पाटील यांनी केले. केळी पिकाच्या विकासासाठी गेल्या तीस वर्षापासून जैन इरिगेशन संशोधनात्मक कार्य करीत आहे. जैन इरिगेशनच्या पायाभूत केळीच्या विकासाच्या कार्यामुळे देशातून केळी ची उत्पादकता तीन पटीने वाढली तर कालावधी निम्मे झाला. निर्यातक्षम गुणवत्तेचे ग्रँड नैन टिश्युकल्चर म्हणजे देशातील केळी उत्पादकांना दिलेली एक अनोखी भेट आहे.ठिबक व फर्टीगेशन मुळे केळीची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे.

त्यामुळे आज आपल्या कडे केळीची मोठी निर्यात होत आहे. बागायदारांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी केळीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने जागतिक केळी दिन साजरा केल्याचेही के. बी. पाटील म्हणाले. भाऊंच्या उद्यानामध्ये आलेल्या नागरिकांनी सकाळी साजरा झालेल्या केळी दिनामध्ये उत्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर पॉर्न व्हिडीओ प्रकरणी ‘त्या’ कीर्तनकार बाबाला अटक

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय..!

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय..!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' निर्णय..!

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us