जळगाव, दि. ५ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत १७ जुलै ते ३ ऑगस्ट, २०१९ या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता बारावी) व माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता दहावी) च्या परिक्षा घेण्यात येणार आहेत.
या कालावधीत परिक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होवू नये व परिक्षा शांततामय व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी दिनांक १७ जुलै, २०१९ ते ३ ऑगस्ट, २०१९ दरम्यान फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) जारी करण्यात आले आहे. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.