Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

najarkaid by najarkaid
October 4, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (जिमाका) दि. 4 – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबरोबरच माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून वेळेत रुग्ण शोधून त्यांचेवर त्वरीत उपचार होत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात 20 हजार 809 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ते 87.87 टक्क्यांवर पोहोचले असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजार 358 ने कमी झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात 28 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 49 हजार 104 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. असे असले तरी जळगाव महसुल, पोलीस, जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमाने त्यापैकी 43 हजार 148 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्ती शोधण्यात आरोग्य यंत्रणेला यश येत असून या रुग्णांचे वेळेत निदान करुन त्यांचेवर त्वरीत उपचार करण्यात येत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच आहे शिवाय रुग्ण दगावण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत झाली आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 20 हजार 589 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असले तरी याच महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 220 ने अधिक आहे. या महिन्यात 20 हजार 809 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर जिल्ह्यात महिन्याभरात 371 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे जिल्ह्याचा मृत्युदर 2.43 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यातही प्रशासनाला यश आले आहे. त्याचबरोबर गेल्या सोळा दिवसांपासून जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून उपचार घेणा-या रुग्णांची संख्या 10 हजार 116 वरुन 4 हजार 758 पर्यंत म्हणजेच 5 हजार 358 ने कमी झाली आहे. हे जिल्ह्यासाठी आशादायक चित्र आहे.

जिल्ह्यात बाधित रुगण कमी होऊन बरे होणाऱ्या रुगणांचे प्रमाण वाढत असले तरी नागरीकांनी बेसावध न राहता बाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर राखावे, दिवसभरात किमान चारवेळा हात साबणाने स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचबरोबर माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ह्याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही…

Next Post

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी प्रमोद परदेशी यांची निवड

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी प्रमोद परदेशी यांची निवड

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी प्रमोद परदेशी यांची निवड

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us