Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात आजपासून तोंडाला मास्क लावणे सक्तीचे

najarkaid live by najarkaid live
April 27, 2020
in आरोग्य, जळगाव
0
जिल्ह्यात आजपासून तोंडाला मास्क लावणे सक्तीचे
ADVERTISEMENT

Spread the love

  • जिल्ह्यात आजपासून तोंडाला मास्क लावणे सक्तीचे
  • नाहीतर होणार पाचशे रुपये दंड
  • जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव, (प्रतिनिधी) ता. 26: जिल्ह्यात वाढलेले कोरोना बाधित रुग्ण पाहता जिल्ह्यात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे, मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड करण्यात येईल, असा इशारा आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला .

जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार रुग्णांचे कोरोणा संसर्ग तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा स्वच्छ धुतलेला रुमाल बांधणे बंधनकारक आहे.

त्याचबरोबर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे.
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंचे पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुकानाच्या बाहेर सोशल डिस्टन्ससिंग पाळण्यासाठी आवश्यक ते चौकोन आखून देणे आवश्यक आहे. ज्या दुकानाच्या बाहेर सोशल डिस्टन्सिग पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या दुकानदारावर ही कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. त्याचबरोबर आवश्यकता असेल त्यावेळी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच जे नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करतील वाहनावर दुचाकीवरून फिरतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
त्यांच्या दुचाकी जप्त करण्याची मोहीम जिल्ह्यात अधिक गतीने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना बाधित जे रुग्ण आढळलेले आहे ते रुग्ण बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोणाची बाधा झालेली आहे ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावात कोणी बाहेरगावावरून आलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील त्यांनी तात्काळ त्यांची तपासणी करून घ्यावी.

जिल्ह्यात अमळनेर व भुसावळ येथील रुग्ण आढळून आल्याने या तालुक्यातील नागरिकांनी अधिक सजग राहून लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावेत.असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

देशभरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु काही नागरिक लॉक डाऊनचे पालन करीत नसल्याचे आढळून येत आहे. अशा नागरिकांवर आवश्यक ती कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. त्याचबरोबर कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
=======

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल ; दोन अटकेत ; पोलीस बंदोबस्त तैनात

Next Post

भुसावळ येथील सिंधी कॉलनी,नहाटा कॉलेज परिसर मध्यरात्री पासून सील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भुसावळ येथील सिंधी कॉलनी,नहाटा कॉलेज परिसर मध्यरात्री पासून सील

भुसावळ येथील सिंधी कॉलनी,नहाटा कॉलेज परिसर मध्यरात्री पासून सील

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us