Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील १८ हजार आबालवृध्दांना प्रवासाची परवानगी !

najarkaid live by najarkaid live
May 18, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यातील १८ हजार आबालवृध्दांना प्रवासाची परवानगी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी दि.16 :- लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर जिल्ह्यातून इतरत्र जाण्यासाठी वा जिल्ह्या बाहेरून येण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून या माध्यमातून आजवर १८ हजार आबालवृध्दांना परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी महसूलचे पथक कार्यरत असून त्यांच्या कार्यप्रणालीचे ना. गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले आहे.

याबाबत वृत्त असे की, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जळगाव जिल्हा प्रशासनाने २८ एप्रिलपासून जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍यांसाठी आणि बाहेर जिल्ह्यातून जिल्ह्यात येणार्‍यांसाठी अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिलेली आहे. यासाठी जळगाव जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर परवानगीसाठी स्वतंत्र विभाग देण्यात आलेला आहे. येथे ऑनलाईन माहिती भरल्यानंतर याची छाननी होऊन परवानगी प्रदान करण्यात येते. तर बाहेरून जिल्ह्यात येणार्‍यांसाठी स्वतंत्र ई-मेल आयडी दिलेला असून यावर आलेल्या माहितीच्या आधारे परवानगी दिली जाते. याच्या जोडीला जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकदेखील दिलेले आहेत. ही प्रणाली यशस्वीपणे कार्यरत रहावी यासाठी उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळकायदा विभागाचे अव्वल कारकून योगेश विठ्ठल पाटील, आस्थापनाचे अव्वल कारकून घनश्याम सानप, योगेश सिताराम पाटील व सुधीर सोनवणे यांचे पथक अविरत परिश्रम घेत आहेत. यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात आला असून येथे रात्री उशीरापर्यंत या प्रणालीचे कामकाज चालते.

२८ एप्रिलपासून १५ मे पर्यंत जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी वा जिल्ह्यात येणार्‍या एकूण १८,५७८ लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर ६२९३ जणांचे अर्ज त्रुटीमुळे नाकारण्यात आलेले आहेत. २७१३ जणांच्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. अर्थात, या कालावधीत एकूण २७५८४ जणांनी अर्ज केलेले आहेत. यात मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या रेड झोनमधील महानगरांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणच्या स्थलांतरीतांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍या परप्रांतीयांना बस व रेल्वेगाडीची सुविधा देखील देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमधील प्रवासाला परवानगी देण्यासाठी कार्यरत असणार्‍या पथकाला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. लॉकडाऊनमध्ये अनेक जण जिल्ह्यात तर जिल्ह्यातील काही जण बाहेर अडकून पडल्याने त्यांची अडचण होत होती. महसूल पथकाच्या कामगिरीने त्यांना दिलासा मिळाला असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. दरम्यान, या पथकाने हेल्पलाईनवर आलेल्या सर्व शंकांचे अचूक व सविस्तरपणे निराकरण केले आहे. यात अनेक असाध्य विकारग्रस्तांना प्रवासाची परवानगी मिळाल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितही बहुतांश ग्रामसेवकांची हेडकॉटरला गैरहजरी !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितही बहुतांश ग्रामसेवकांची हेडकॉटरला गैरहजरी !

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us