Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची सभा संपन्न

najarkaid live by najarkaid live
November 26, 2019
in जळगाव
0
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची सभा संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव – जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागामार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., जळगाव डॉ. दिलीप पोटोळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, पोलीस विभागाचे श्री,राठोड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, कार्यक्रम सहाय्यक गिरीश गडे यांच्यासह आरोग्‍य विभागातील विविध डॉक्टर, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच  राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून  या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात विविध विभागांचा सहभाग करवून घेण्याकरीता व एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच एचआयव्ही, टीबी, एआरटी यांच्या झालेल्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समिती सभेत एड्स नियंत्रण व प्रतिबंधक अभियानाचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. त्यात प्रामुख्याने 1 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 8.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयापासून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रभातफेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या होणार असून त्याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात पोस्टर प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालयात 2 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता  मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यात एचआयव्हीबाबत मार्गदर्शन व एैच्छिक तपासणी करणे आणि आयईसी साहित्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच जळगाव रेल्वे स्थानक व बसस्थानक येथे सकाळी 10 वाजता पोस्टर प्रदर्शन, मार्गदर्शन व आयईसी साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 5 ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील 60 महाविद्यालयात स्थापित असलेल्या रेडरिबिन क्लबद्वारे युवकांमध्ये पोस्टर प्रदर्शन, व्याख्यान, चित्रफित दाखवून जिल्ह्यातील 23 आयसीटीसी केंद्राद्वारे युवकांसाठी विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे. त्याचबरोबर 10 ते 31 डिसेंबर या कालावधीत दिशा समाजप्रबोधन संस्था, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

दिनांक 9  डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता संगीत सभागृह, भास्कर मार्केट जवळ, जळगाव येथे आणि  10 डिसेंबर रोजी  जिल्हा उद्दोग केंद्र, भुसावळ येथे पोस्टर प्रदर्शन, लघुपट आणि व्याखानाचे तर दुपारी 2.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव येथेही पोस्टर पदर्शन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधार संस्था, अमळनेर तर्फे 10 ते 14 डिसेंबर दरम्यान अमळनेर, पाचोरा, चोपडा तालुक्यांतील देह विक्रय करणाऱ्या भगिनीकरिता, भगिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

एमएसएम (पुरुष, पुरुषांमध्ये लैंगिक संबध) मेळाव्यांतर्गत गोदावरी फाऊंडेशन, लुंकड मार्केट, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, व्याख्याने, लघुपट इत्यादि कार्यक्रमाचे आयोजन व 13 डिसेंबर रोजी डिआयसी केंद्र, भुसावळ येथे सायंकाळी 4.00 वाजता गोदावरी संस्था, जळगाव यांचेतर्फे आयोजित करण्यात येणार आहेत. राष्ट्रविकास संस्था, जळगाव यांचेमार्फत 16 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता एमआयडीसी, जळगाव येथे पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप, लघुपट, व्याख्याने अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांच्या मेळाव्यांतर्गत 5 ते 20 डिसेबर दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर व शहराच्या आत येणाऱ्या नाक्यावर पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रिका वाटप व व्याख्याने देवून उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागांमध्ये 100 गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर, विविध मंडळे यांचे माध्यमांद्वारे ग्रामीण जनतेमध्ये एचआयव्ही एड्स विषयी जनजागृतीपर कार्यक्रम लिंक वर्कर (क्षेत्रीय कार्यकर्ते) आधार संस्था, अमळनेर यांचेमार्फत करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित यंत्रणेने या अभियानात स्वयंस्फुर्तीने आपला सहभाग नोंदवून जिल्हा एड्स, टीबी मुक्त करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंखा दुरुस्तीचे कारण सांगून शेतकर्‍याची आत्महत्या

Next Post

युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

युवाशक्ती फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

ताज्या बातम्या

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us