Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून स्नेहाची शिदोरी अविरत राहणार

श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या ८३ व्या जयंती दिनी अशोक जैन यांची घोषणा

najarkaid by najarkaid
December 13, 2020
in राज्य
0
जळगाव शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून स्नेहाची शिदोरी अविरत राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत एप्रिलपासून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि जैन इरिगेशन कंपनीद्वारा ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जळगाव शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम अविरत सुरू ठेवणार असल्याची घोषणा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ८३ व्या जयंतीदिनी आयोजित भक्तीसुधारस या कार्यक्रम प्रसंगी केली.

‘आपला समाज सातत्य, समर्पण आणि सेवा जोपासणाऱ्या माणसांवर उभा आहे.’ श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचा हा संस्कार जैन परिवारावर खोलवर रुजल्याचीच ही प्रचीती. अशोक जैन यांनी मोठ्याभाऊंच्या काही भावस्पर्शी आठवणी सांगत ही घोषणा केली. साधारणतः 2015 मध्ये जळगाव शहरातील कोणताही नागरीक उपाशी राहू नये असे संवेदनशील विचार मोठ्याभाऊंच्या मनात सातत्याने येत होते. समाजाकडून आपण भरभरून घेत असतो, आपणही समाजासाठी कृतज्ञतापूर्वक नक्कीच काही केले पाहिजे या भावनेतून भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांसाठी सकाळ-संध्याकाळ भोजन उपलब्ध करून देण्यासंदर्भात भवरलालजी जैन उर्फ मोठ्याभाऊंनी अशोक जैन यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला होता. एकूणच या संदर्भात नियोजन काय करता येईल, या संकल्पनेची अंमलबजावणी कशाप्रकारची असेल, नेमके स्वरूप निश्चित होत होते परंतु, प्रत्यक्ष ही संकल्पना सुरू करण्यात काहीना काही व्यत्यय येत राहिला. श्रद्धेय मोठ्याभाऊंचे निर्वाण होईस्तोवर ही संकल्पना प्रत्यक्ष कृतिशील न झाल्याची सल जैन परिवाराला होती. 25 फेब्रुवारी 2016 रोजी भवरलालजींनी या जगाचा निरोप घेतला. जैन परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक दलुभाऊ जैन यांनी त्यानंतरच्या प.पू. कानमुनींच्या पहिल्या चातुर्मासात भाऊंच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ जैन समाजातील बांधवांसाठी विनामूल्य भोजनालयाची व्यवस्था केली व ती सुविधा आजही सुरू आहे.

कोविड-19 या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला मराणाची दशा दर्शवली तशी जगण्याची दिशाही दिली. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच संवेदनशील वर्तन करून सेवाभाव जोपासला पाहिजे त्यातच आपल्या आयुष्याचे सार्थकत्व आहे या विचारांचे प्रत्यक्ष दर्शन दिसले ते ‘स्नेहाची शिदोरी’ या संकल्पनेत. लॉकडाऊन काळात अनेक प्रकारच्या गंभीर परिस्थितीला जनसामान्यांना सामोरे जावे लागले. भोजनाची आवश्यकता असणाऱ्यांना सेवाभावी वृत्तीने घासातला घास देण्याचा जैन परिवाराचा संस्कार येथेही कामी आला. कांताई सभागृहातून 1 एप्रिल 2020 ते 12 डिसेंबर 2020 दरम्यान दोन वेळचे सुमारे 8 लाखाच्यावर भोजन पाकिटे देण्यात आली. स्नेहाची शिदोरी उपक्रम सुरू असताना मोठ्याभाऊंच्या कायम स्वरूपी भोजन उपलब्ध करण्याच्या संकल्पनेची जैन परिवारास सातत्याने आठवण होतीच. ‘स्नेहाची शिदोरी’ अव्याहत रहावी असे जैन परिवाराद्वारा निश्चित करण्यात आले. मोठ्याभाऊंच्या 83 व्या जन्मदिनानिमित्त ‘स्नेहाची शिदोरी’ कायम स्वरूपी राहिल ही अशोक जैन यांनी घोषणा केली. कालानुरूप या भोजनालयाबाबत योग्य ते निर्णय निश्चित घेतले जातील मात्र ही संकल्पना यापुढे निरंतर सुरू राहणार आहे ज्यामुळे शहरातील कोणतीही व्यक्ती उपाशी झोपणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगाव येथील बसस्थानक चौकात केंद्र सरकारच्या महागाई वाढी विरोधात भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे निदर्शने

Next Post

पीएचडी असलेल्या प्राध्यापकाच्या ‘कॉपी पेस्ट’ पुस्तकं प्रकाशनानं उघड झाले वाङमयचौर्य

Related Posts

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Next Post
पीएचडी असलेल्या प्राध्यापकाच्या ‘कॉपी पेस्ट’ पुस्तकं प्रकाशनानं उघड झाले वाङमयचौर्य

पीएचडी असलेल्या प्राध्यापकाच्या 'कॉपी पेस्ट' पुस्तकं प्रकाशनानं उघड झाले वाङमयचौर्य

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us