Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव विमानतळावरून नाईट लँडिंग सेवेचा मार्ग मोकळा

najarkaid live by najarkaid live
February 1, 2020
in जळगाव
0
जळगाव विमानतळावरून नाईट लँडिंग सेवेचा मार्ग मोकळा
ADVERTISEMENT

Spread the love

कमीत कमी दिवसांत नाईट लँडिंग परवानगी मिळणारे देशातील पहिले विमानतळ 
 खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली हुन दिली गोड बातमी 
जळगाव -रात्रीचे विमानसेवा व खराब हवामाना मुळे अनेकदा विमानसेवेत बाधा निर्माण होत होती त्यातच गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विमानसेवा विस्कळीत झाली होती. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी.आणि तातडीने उच्च दर्जाची विमानसेवा प्रवाशांना बहाल करता यावी यासाठी दिल्लीत नागरी विमान मंत्रालयाचे प्रधान सचिव प्रदीपसिंग खरोला यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट घेतली  होती रात्रीची विमानसेवा तसेच खराब हवामानात विमानसेवा सुरू राहावी या सादर केलेल्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रधान सचिव प्रदीप खरोला यांनी कार्यवाही करण्याचे सूचित केले होती.त्यामुळे पुढील नऊ दिवसात उपकरणांच्या चाचणी साठी तज्ञ समितीने भेट दिली. तर गेल्या महिन्यात तज्ञानी नाईट लँडिंग उपकरणे बसविली त्याची पाहणी देखील खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली होती.आज अखेर नाईट लँडिंग परवानगी देण्यात आली असून लवकरच जळगाव विमानतळ येथून रात्र दिवस आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानसेवा सुरू होणार असून जिल्ह्याच्या दळणवळणास मोठी गती मिळेल.कमीत कमी दिवसांत नाईट लँडिंगची परवानगी मिळविणारे जळगाव विमानतळ देशातील एकमेव विमानतळ ठरले असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलीयम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे.
 कमीत कमी दिवसांत परवानगी मिळणारे देशातील पहिले विमानतळ 
जळगाव विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आणि मुखत्वे खराब हवामानात विमानसेवा सुरळीत चालू राहावी यासाठी सेकंड सर्किट ऑफ रनवे,ग्रेडींग ऑफ रनवे बेसिक स्ट्रीट,पापीज तसेच इतर यंत्रणेची उभारणी करण्यात आली.यासाठी  केंद्राच्या तज्ञांची तपासणी आणि चाचणी समिती ने सर्व उपकरणे बसविली याची गेल्याच पंधरवाड्यात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाहणी करून परवानगी साठी  संबधित विभागासह प्रधान सचिव श्री. खरोला यांचेशी संपर्क केला होता
 जळगांव विमानतळावरून आवश्यक उपकरणांसह यंत्रणा अद्यावत करून मिळावी ययासाठी सात्यत्याने खासदार उन्मेश दादा पाटील व खासदार रक्षाताई खडसे यांनी नागरी उड्डयन मंत्री ना.  हरदीपसिंग पुरी यांची वेळोवेळी भेट घेतली व त्यांना निवेदनही दिले होते त्यांनी सर्व समस्या समजून घेत नागरी विमानन महानिदेशक ( Director General Civil Avaition )  यांना आदेश दिले.त्याचा परिणाम जळगाव विमानतळ नाईट लँडिंग परवानगी देण्यात आली आहे.येत्या काळात पुणे व इंदोर तसेच मोठी शहरांसाठी विमानसेवा  सुरू होण्याबाबत कुठलीही अडचण निर्माण होणार नाही तसेच  लवकरच  विमानतळावरून जळगावकरांना उच्च दर्जाची विमान सेवा अनुभवता येणार याची  उत्सुकता वाढली आहे.
.
 आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आग्रही – खा. उन्मेश दादा पाटील 
जळगाव विमानतळाच्या नाईट लँडिंग विषयीचा प्रस्ताव मंजूर करून भक्कम पाठपुरावा सुरू ठेवला त्याचा परिणाम आज परवानगी मिळाली याचा मला देखील आनंद आहे यापुढे देखील जळगाव येथून आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानसेवा मिळावी.देशातील जास्तीत जास्त  “मेट्रोपोलिटन सिटी कनेक्टीव्हीटी” मिळावी यासाठी प्रयत्न सुरूच राहतील सर्व पातळीवर पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. जळगाव विमानतळ हे देशात आघाडीचे विमानतळ म्हणून  विकसित होईल. सर्वसामान्य जनतेला देखील विमानसेवेचा लाभ घेता यावा हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण होणार आहे.अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
खासदार उन्मेश दादांची अग्रेसिव्ह भूमिकेचे व्यापारी वर्गात स्वागत 
जळगाव जिल्ह्यात दळणवळणाचा वर्तुळ पूर्ण झाला असून जसे शेजारच्या औरंगाबाद शहरात  एम आय डी सी वाढीसाठी विमानसेवेची मोठी भूमिका आहे .मात्र जळगाव येथे व्यापार वृद्धीसाठी पोषक वातावरण असताना केवळ  फक्त चांगल्या दर्जाची रात्र दिवस विमानसेवा नसल्याने  व्यापारी उद्योजक नाखूष होते त्यांनी ही बाब वेळोवेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे मांडली होती  जळगाव विमानतळावर विमानांचे “नाईट लॅंडींग’ व्हावे यासाठी मिशन मोडवर खासदार उन्मेश पाटील काम करावे अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादांनी  प्रत्यक्षात उतरवली असून आज केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्रही प्राप्त झाल्याने  खासदार उन्मेश दादा ब पाटील यांनी दिल्लीत विशेष पाठपुरावा केल्यानेच परवानगी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गात उमटली असून जळगाव अडव्हायझरी कमेटी अध्यक्ष या नात्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले जाते आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रीडा मंत्री केदार यांची भेट

Next Post

गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us