जळगाव प्रतिनिधी | महापालिकेतील भाजपातून बाहेर पडलेल्या बंडखोर तीन नगरसेवकांनी आपल्या पक्षात घरवापसी केल्याचा निर्णय घेतला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या महापौर निवडीवेळी भारतीय जनता पक्षाचा व्हीप झुगारत शिवसेनेच्या उमेदवारास मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यात का येऊ नयेत? यासाठी विभागीय आयुक्तांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावल्या आहेत. आयुक्तांनी भाजप सदस्यांना नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मात्र आता भाजपने याची परतफेड करून बंडखोर गटातील तिघांना गळाशी लावले आहे. नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी, व हसिना बी शेख या तीन सदस्यांनी आज पुन्हा आपण भाजप सोबत असल्याचे जाहीर केले आहे. या तिघांचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.