Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात आढळून आले 1 लाख 10 हजार जुन्या आजारांचे रुग्ण

najarkaid by najarkaid
October 6, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात
  • जळगाव जिल्ह्यात आढळून आले 1 लाख 10 हजार जुन्या आजारांचे रुग्ण
  • जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती
  • • जिल्ह्यातील 8 लाख 12 हजार 477 कुटूंबांतील 34 लाख 81 हजार 169 नागरिकांची तपासणी पूर्ण.
  • • जिल्ह्यात आढळून आले 1 लाख 9 हजार 519 जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण.
  • • सारीचे 573 तर सर्दी, खोकला, ताप (ILI) चे 6 हजार 511 रुग्ण आढळून आले.
  • • कोरोना बाधित 1 हजार 226 रुग्ण शोधण्यात आरोग्य पथकांना आले यश.
  • जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 12 हजार 477 कुटूंबांतील 34 लाख 81 हजार 169 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 1 लाख 9 हजार 519 जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

    कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान संपूर्ण राज्यात 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जळगाव महापालिका क्षेत्रात महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तर जिल्ह्यातील 18 नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी तर नगरपालिका क्षेत्रात नगरपालिका प्रशासन अधिकारी जनार्दन पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.

    माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 533 पथके, नगरपालिका क्षेत्रांमध्ये 280 तर महापालिका क्षेत्रात 134 असे एकूण 2974 पथके जिल्हाभरात कार्यरत आहेत. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके जळगाव जिल्ह्यातील नागरीकांच्या घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहेत. यात कुटूंबातील सदस्याचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत असून ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणांची तपासणी करीत आहेत.

    जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 6 लाख 53 हजार 673 कुटूंबांना भेट दिली असून या कुटूंबातील 27 लाख 7 हजार 311 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 78 हजार 210 जुन्या विकारांचे, सारीचे 555 तर सर्दी, खोकला, ताप (ILI) चे 6 हजार 332 रुग्ण आढळून आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून 9 हजार 339 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी 887 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.

    जिल्ह्यातील अठरा नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील 68 हजार 888 कुटूंबातील 4 लाख 68 हजार 36 नागरीकांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 20 हजार 529 जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 683 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले यापैकी 339 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.

    त्याचप्रमाणे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 89 हजार 916 कुटूंबातील 3 लाख 5 हजार 822 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 10 हजार 780 जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सारीचे 18, सर्दी, खोकला, तापाचे 179 रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 166 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तर 86 संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहे.

    नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या वतीने हाथरस घटनेबाबत निवेदन

Next Post

एरंडोल येथील आकाश त्रिवेदी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेत २२६ वा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
एरंडोल येथील आकाश त्रिवेदी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेत २२६ वा

एरंडोल येथील आकाश त्रिवेदी जेइइ ॲडव्हान्स परीक्षेत २२६ वा

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us