- पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे याची माहिती

जळगाव – जळगाव ग्रामीण विधानसभा मधून अपक्ष निवडणूक लढवीत असलेले जितेंद्र देशमुख उर्फ रवी देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिला असून पुरस्कृत उमेदवार व बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरी असलेले पाठिंब्याचे पत्र या वेळी रवी देशमुख यांना आज आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी देण्यात आले.
ग्रामीण भागात विकास नाहीच – रवी देशमुख
ग्रामीण भागात विकास नाहीच असे म्हणत केलेले काम हे थातुर मातुर आहेत. जनतेला फसविणाऱ्याना जनता धडा शिकवेल.येणाऱ्या 21 तारखेला वंचित आघाडीला मला मतदानरूपी आशीर्वाद देऊन संधी द्यावी असे अवाहन रवी देशमुख यांनी यावेळी केली.














