जळगाव,(प्रतिनिधी)- ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच याला जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपा तर्फे आकाशवाणी चौक जळगांव येथे आमदार राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वात ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










