जळगाव । जळगाव महापालिकेत भाजपला पुन्हा धक्का बसला आहे. कारण महापालिकेतील भाजपाच्या चार नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यापूर्वी महापौर निवडीप्रसंगी बंडखोरी करत भाजपच्या २८ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे आणण्याचा यशस्वी डाव खेळाला होता. १० नगरसेवक पुन्हा भाजपत गेल्यानंतर शिवसेना पुन्हा बहुमताच्या काठावर पोहचली होती.
हे देखील वाचा :
देशभरात Airtel ची सेवा डाउन, वापरकर्त्यांना इंटरनेट चालवण्यात त्रास
“संजय राऊत यांना इतकी मस्ती आहे की,…”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
सेक्स खाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा; समंथाच्या विधानावर तहलका
पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज
दरम्यान, चार नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. शुक्रवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी पाळधी येथे शिवबंधन बांधले आहे. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सभागृह नेते ललित कोल्हे, सरिता माळी, धुडकू सपकाळे, मंगेश जोहरे, गोकुळ पाटील, ऍड.दिलीप पोकळे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, हर्षल मावळे आदी उपस्थित होते.
















