जळगाव :- शहरातील इस्लामपुरा परिसरात एका पाच वर्षीय बालिकेचा अपहरणाचा प्रयत्न केला गेला. परंतू सतर्क नागरिकांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडल्याची घटना आज दुपारी घडली . यावेळी नागरिकांनी तरुणास चोप देऊन पिलिसांच्या स्वाधीन केले . यामुळे खळबळ उडाली होती.
इस्लामपुरातील एका ५ वर्षीय मुलगी आपल्या अंगणात खेळत होती. त्याच वेळी अरुण ठाकूर (वय 30, रा कांचन नगर) हा दुपारी एक वाजेच्या सुमारास दाराजवळ येऊन संबंधित मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्नात होता. हा प्रकार संबंधित मुलीच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. यानंतर गल्लीतील मुलांनी संशयित आरोपीला पकडून शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.