जळगाव, दि. 2 – कोरोना विषाणूचा संसर्ग देशभर फैलावत असून आज जळगाव जिल्ह्यातील एका कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोनाचा हा पहिला मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या दोन होती त्यापैकी काल पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णाचा नुकताच मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.