जळगाव – जळगावकरांना दिलेला शब्दनं शब्द पाळण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे आमदार सुरेश दामू भोळे(राजूमामा) यांनी नागरिकांची संवाद साधतेवेळी सांगितले आहे.
पुढे आ.राजूमामा भोळे म्हणाले की, शहराच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अमृत योजना केंद्रातील मोदी सरकाने स्थानिक लोक्सप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने जळगाव शहराकरिता मंजूर केली, संपूर्ण शहराचा विस्तार पाहता अमृत योजनेचा काम पूर्ण करण्याचा कालावधी अतिशय कमी असल्याने ठेकेदारास वेळ अपूर्ण पडला, अमृत योजनेचे त्वरित काम पूर्ण करून शहरातील रस्त्यांचे कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत, राज्यशासनाच्या माध्यमातून निधीची कोणतीही कमतरता नसून शहर सौदर्यकरणावर अधिक भर असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले.
नगरउत्थान योजनेतून शहराच्या रस्त्याकरिता एकूण १०० कोटी निधी गेल्या वर्षभरात महापालिका निवडणुकीत सांगितल्या प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे, अमृत योजनेचे काम ठेकेदाराने वेळेत पूर्ण न केल्यामुळे शहर वासियांना अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र अमृत योजना त्वरित पूर्ण करून नगरउत्थान योजनेतून त्वरित रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यात येणार आहे.
जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यांचे विकासकामे व्हावी, याकरिता प्रयत्नशील होतो, मात्र अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्त्याचे कामे पूर्ण करता येणार नाही, अमृत योजनेमध्ये रस्ते फोडून जलवाहिनीचे पाईप टाकण्यात येत असून यामुळे रस्ते फोडावे लागत आहे, विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे, जळगावची मागील अवस्था बदलविण्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे, मी जनतेचा बांधिल असून दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार आमदार राजूमामा भोळे यांनी प्रिप्राळा येथे आयोजित बैठकीत सांगितले आहे.