Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि हे कुठे; भुजबळांचा घणाघात

najarkaid by najarkaid
January 13, 2020
in राज्य
0
छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि हे कुठे; भुजबळांचा घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकावर सर्व स्तरांतून चौफेर टीका होत असताना शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भारतीय जनता पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. या पुस्तकाशी आपला संबंध नाही हे आज संध्याकाळपर्यंत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही केवळ चमचेगिरी असल्याचा शाब्दिक प्रहार राऊत यांनी केला आहे. याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कल्पना नसावी, म्हणून त्यांना दोषी धरता येणार नाही, असेही राऊत यांनी आवर्जून म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे महाराष्ट्र भाजपला मान्य आहे का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांना कधी १३ वा अवतार ठरवले गेले, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी त्यांची तुलना केली गेली, याकडे लक्ष वेधत ही केवळ चमचेगिरी असल्याचे राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्षाने हे पुस्तक त्वरीत मागे घ्यावे. तसेच आज संध्याकाळपर्यंत राज्य भाजपने या पुस्तकाबाबत आपले काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे, राज्यातील जनतेलाही ते जाणून घ्यायचे आहे, असे राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज कुठे, हे कुठे

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही ‘आजके शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर टीकेची झोड उठवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कधीही तुलना होऊ शकत नाही. पूर्वी आपली स्तुती करण्यासाठी राजे भाट ठेवत असत. हा त्यातीलच प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांना कधी ‘हर-हर मोदी’ तर कधी ‘शिवशंभो; असे संबोधले जाते. या कडे लोकांनी दुर्लक्ष करून पाहिले. मात्र आता तर थेट त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशीच होऊ लागली आहे, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि हे कुठे, अशा शब्दात भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बिहारमध्ये एनआरसी लागू होणार नाहीः- सीएम

Next Post

शिवसेनेचे ३५ आमदार असंतुष्ट: नारायण राणे

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिवसेनेचे ३५ आमदार असंतुष्ट: नारायण राणे

शिवसेनेचे ३५ आमदार असंतुष्ट: नारायण राणे

ताज्या बातम्या

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us