चाळीसगाव, (किशोर शेवरे) – येथील महाराणा प्रताप गृहनिर्माण सोसायटी चाळीसगाव जिल्हा जळगाव (अण्णासाहेब सोनूसिंग पाटील नगर) या संस्थेमार्फत १,११,१११(एक लाख ,अकरा हजार, एकशे अकरा रुपये,) चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी covid-19, या नावाने दिनांक 20 रोजी चाळीसगाव तहसीलदार साहेब अमोल मोरे, यांच्याकडे देण्यात आला.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना ने थैमान घातल्याने देशासह महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा रोजच वाढत आहे त्यात लॉक डाऊन मुळे सर्वत्र काम धंदे बंद आहेत त्यामुळे शासनाला गोरगरीब जनतेसाठी अनेक उपाययोजना कराव्या लागत आहेत म्हणून शासनावर मोठा आर्थिक भार येत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोरोना वर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचे आव्हान केले होते यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराणा प्रताप गृहनिर्माण सोसायटी चाळीसगाव जिल्हा जळगाव (अण्णासाहेब सोनूसिंग पाटील नगर) या संस्थेमार्फत १,११,१११(एक लाख ,अकरा हजार, एकशे अकरा रुपये,) चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी covid-19, या नावाने दिनांक 20/4/2020 रोजी चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे, यांच्याकडे देण्यात आला त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजयभाऊ ठाकरे, सचिव महेंद्रबापू पाटील, संचालक शिवाजीआप्पा राजपूत, जगतसिंग राजपूत, कोमलसिंग राजपूत, अरुण पाटील, संग्रामसिंग शिंदे, देवेंद्र पाटील, जयसिंह पाटील, आदी कार्यकर्ते व संचालक मंडळ उपस्थित होते.