चाळीसगाव/ प्रतिनिधी :- चाळीसगाव येथील दै.बाजीराव चे कार्यकारी संपादक सुनीलसिंह राजपुत यांचे चिरंजीव व कल्याण क्राईमब्रॅन्च युनिट-3 मध्ये कार्यरत असलेले पो. कॉ. अजितसिंह सुनिलसिंह राजपूत यांना ऑक्टोबर 2019 मध्ये डोंबवली पोलीस स्टेशनमधील गुन्हा र. नं. 220/2019 भादवी कलम 302, 201 चा उत्कृष्ठ तपास करुन गुन्ह्याची उकल केल्याबद्दल त्यांना नुकतेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सु. कु. जायस्वाल यांच्या पुरस्काराने एका कार्यक्रमातून नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.
ठाणे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महिलेचा झालेला खुन आणि या खुनाच्या तपासासाठी कुठलाही सबळ ओळखीचे पुरावे नसतांना तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात जावून तपासाची चक्रे फिरवीत गुन्ह्याची उकल करण्यात गुन्ह्यात्मक अन्वेषनासाठी सर्वउत्कृष्ठ प्रयत्न म्हणून पोलीस महासंचालकांचे हे प्रशस्तीपत्र त्यांना काल पोलीस आयुक्त विवेक संसाळकर यांच्या हस्ते देण्यात आले.















