कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
धुळे ;- येथील न्यायालयात घरकुल गोटाळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारानं आत जाण्यास मज्जाव करून अरेरावी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि , घरकुल घोटाळ्याच्या निकालाचे वार्तांकन करण्यासाठी आज पत्रकार न्यायालयात गेले असता पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांनी पत्रकार गणेश सूर्यवंशी,विजय शिंदे यांच्याशी व्हरांड्यात एका बाजूला उभे असताना वाद घातला . यानंतर पत्रकार प्रशांत परदेशी आले असताना त्यांची कॉलर धरली . तसेच यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली . त्यामुळे संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.