Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग.स. सोसायटी कर्मचार्‍यांनां सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार : ना.पाटील

Editorial Team by Editorial Team
September 28, 2021
in जळगाव
0
ग.स. सोसायटी कर्मचार्‍यांनां सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार : ना.पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  : सरकारी नोकरांची सहकारी पतपंस्था अर्थात ग.स. सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी यासाठीचे अनुज्ञेय फरकाची रक्कम थकीत होती. या प्रकरणी कर्मचार्‍यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना साकडे घातले असता त्यांनी संस्थेच्या प्रशासकांसोबत बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावला. यामुळे आता कर्मचार्‍यांना ३-४ टप्प्यात थकीत रक्कम मिळणार आहे. यातील २ कोटी २० लाख रूपयांचा पहिला टप्पा कर्मचार्‍यांना तात्काळ मिळणार आहे. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी ही समस्या सुटल्याने कर्मचार्‍यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

याबाबत माहीती अशी की, ग.स. सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून यानुसार त्यांना वेतन मिळत आहे. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार कर्मचार्‍यांना अनुज्ञेय रक्कम ही मिळालेली नसल्याने कर्मचारी नाराज होते. ग.स.सोसायटीची आर्थिक स्थिती उत्तम असून ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेला १३ कोटी रूपयांचा लाभ झालेला आहे. यामुळे संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश प्रदान केला आहे. याच प्रमाणे कर्मचार्‍यांची थकीत असणारी रक्कम मिळावी अशी मागणी सोसायटीच्या कर्मचारी हितकारणी पतपेढी कर्मचारी संघटनेतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली होती. कर्मचार्‍यांनी ही समस्या सोडविण्याचे साकडे पालकमंत्र्यांना घातले होते. याची दखल घेऊन ना. गुलाबराव पाटील यांनी कर्मचारी संघटना आणि ग.स. सोसायटीचे प्राधिकृत अधिकारी विजयसिंह गवळी यांची अजिंठा विश्रामगृहात बैठक घेतली.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत, सोसायटीने कर्मचार्‍यांची थकीत रक्कम टप्प्यांमध्ये देण्याचा तोडगा सुचीविला. कर्मचार्‍यांनी १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०२० या दरम्यानच्या फरकाची एकूण रक्कम ही १० कोटी ८१ लक्ष इतकी थकीत आहे. मात्र सोसायटीने यंदा आधीच खूप खर्च केला असल्याने दोन टप्प्यांऐवजी ही रक्कम ३-४ टप्प्यांमध्ये देण्यात यावेत अशी विनंती प्रशासक विजयसिंह गवळी यांनी केली. यातील पहिला हप्ता हा २ कोटी २० लाख रूपयांचा देण्यात येणार असून कर्मचार्‍यांनी याला होकार दिला. या निर्णयामुळे ग.स. सोसायटीच्या एकूण ४१७ कर्मचार्‍यांना लाभ होणार आहे. यातील ३१७ कर्मचारी सेवेत असून उर्वरित सेवानिवृत्त झालेले आहेत. या समस्तयेची दखल घेऊन कर्मचार्‍यांची समस्या सोडविल्याबद्दल कर्मचार्‍यांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

या बैठकीला कर्मचारी हितकारणी पतपेढी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष संजय नारखेडे, सचिव उज्ज्वल पाटील, खजिनदार अनिल सोनवणे आणि सदस्य नारायण आप्पा सोनवणे, मनोज चव्हाण, महेशचंद्र सोनवणे, सचिन भोसले, राहूल कुमावत, निलेश ससाणे, गोपाळ पाटील, निंबा सोनवणे, राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिरव्या मिरच्या खाण्याचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे

Next Post

चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांसाठी महत्वाची बातमी…

चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान

ताज्या बातम्या

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us