मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- तहसीलदार यांच्या आदेशानुसार तालुक्यातील नायगाव येथील रेशन दुकानातील धान्य हस्तांतर प्रक्रियेदरम्यान गौतम प्रधान यांनी गर्दी जमवून, नागरिकांना भडकवले अशी तक्रार स्वस्त धान्य दुकानदार यांचे पती रवींद्र पोहेकर यांनी दिली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात गर्दी जमवून नागरिकांना भडकावून वातावरण दूषित केले आहे. मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या आदेशान्वय स्वस्त धान्य दुकानातील धान्य हस्तांतर करण्याच्या प्रसंगी गौतम सुकदेव प्रधान यांनी ट्रॅक्टर मधील धान्याचे कट्टे बाहेर काढण्यास भाग पडले असून शासकीय कामात अडथळा आणला आहे तसेच कलम 144 चे उल्लंघन केले आहे. तरी संबंधीत व्यक्ती विरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रवींद्र पोहेकर यांनी केली आहे.















